एक्स्प्लोर

''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल

Baramati Loksabha : बारामतीमधील निवडणूक लढतीसंदर्भात बोलताना, शरद पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असे म्हणत सुनेत्रा पवार ह्या सुन आहेत, तर सुप्रिया ही पवारांची लेक असल्याचं बोलून दाखवलं होतं

Baramati Loksabha : पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भावजय लढत आहे. शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना होत असल्याने राज्यासह देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्यातच, पवार कुटुंबातील या सामन्यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बाहेरुन आलेले पवार म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांना टोला लगावला होता. त्यावरुन, राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला. तर, अजित पवारांनीही शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या वादात उडी घेतली असून सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतून थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे.

बारामतीमधील निवडणूक लढतीसंदर्भात बोलताना, शरद पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असे म्हणत सुनेत्रा पवार ह्या सुन आहेत, तर सुप्रिया ही पवारांची लेक असल्याचं बोलून दाखवलं होत. त्यावर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट हल्लाबोल केला आहे. ''ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे असतात त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे मतही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले असून ते सत्यात उतरवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे लागेल. तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे. त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता येथे आली आहे, ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची पोचपावती असून बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अशी दिग्गज मंडळी अर्ज भरताना पुण्यात आली होती. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, आता दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला गती मिळणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतानाचे पाहायला मिळेल. 

संबंधित बातम्या

''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: पैशांच्या बंडलांनी भरलेली बॅग, सोन्याचे दागिने; बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाड
पैशांच्या बंडलांनी भरलेली बॅग, सोन्याचे दागिने; बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाड
Rakhi Sawant : राखीच्या आजारपणावरून तिचे Ex-Husbands भिडले; एक म्हणतो,
राखीच्या आजारपणावरून तिचे Ex-Husbands भिडले; एक म्हणतो, "ती आजारी", तर दुसरा म्हणतोय, "ही खोटारडी"
Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
Yed Lagla Premach : 'बिग बॉस'फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री! झळकणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत
'बिग बॉस'फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री! झळकणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Collapse : मुंबईत होर्डिंग उभारणीचे नियम काय सांगतात? Special ReportIndia Alliance BKC Rally : मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सांगता सभा ABP MajhaNarendra Modi Rally Mumbai : शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा, PM मोदी, राज ठाकरेंची तोफ धडाडणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: पैशांच्या बंडलांनी भरलेली बॅग, सोन्याचे दागिने; बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाड
पैशांच्या बंडलांनी भरलेली बॅग, सोन्याचे दागिने; बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाड
Rakhi Sawant : राखीच्या आजारपणावरून तिचे Ex-Husbands भिडले; एक म्हणतो,
राखीच्या आजारपणावरून तिचे Ex-Husbands भिडले; एक म्हणतो, "ती आजारी", तर दुसरा म्हणतोय, "ही खोटारडी"
Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये
Yed Lagla Premach : 'बिग बॉस'फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री! झळकणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत
'बिग बॉस'फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री! झळकणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत
Mumbai Lok Sabha: मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा; पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकाच मंचावर, तर बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार
मुंबई जिंकण्यासाठी आज सभांचा धुरळा; शिवाजी पार्कात महायुतीची, तर BKC मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच
Lok Sabha Election 2024: 24 तासांतच ममता बॅनर्जींचा यु-टर्न; आधी म्हणाल्या,
ममता बॅनर्जींची नेमकी भूमिका काय, इंडिया आघाडीला बाहेरुन समर्थन की सोबत? 24 तासांत दोन वेगवेगळी वक्तव्य
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
Embed widget