एक्स्प्लोर

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला

Nashik News: नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरेंचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर; एकनाथ शिंदेंनी धनुष्याची प्रत्यंचा ताणून बाण सोडला. ठाकरेंच्या मावळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके'ची घोषणा दिली

नाशिक: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये गुरुवारी रोड शो केला. हा रोड शो सुरु असताना हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या रोड शो वेळी प्रचाररथ रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी एका चौकात ठाकरे गटाचे (Thackeray Camp) शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले. तेव्हा घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरु झाल्यानंतर एका चौकात ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोळका करुन उभे होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रचाररथ येताना दुरुनच पाहिले. त्यानंतर ठाकरे गटाच्या सैनिकांनी '50 खोके, एकदम ओके'ची घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दूर अंतरावर रोखून ठेवले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांचा प्रचार रथ चौकात येताच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणखी जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. हा आवाज एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहत धनुष्याची प्रत्यंचा ताणत बाण सोडल्याचा अभिनय केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा प्रचार रथ पुढे निघून गेला. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात थेट लढत असल्याने दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. 

एकनाथ शिंदे नाशकात लँड होताच पोलिसांकडून हेलिकॉप्टरमधील बॅग्सची तपासणी

नाशिकची जागा महायुतीसाठी महत्त्वाची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांत दुसऱ्यांदा नाशिकमध्ये आले आहेत. गेल्यावेळी शिंदे नाशिकमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे गुरुवारी नाशिकच्या हेलिपॅडवर लँड झाले तेव्हा पोलिसांनी स्वत:हून त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत कॅमेऱ्याचे साहित्य, कपडे, औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही.

आणखी वाचा

संजय राऊतांचा एक आरोप अन् नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'जड' बॅगांची तपासणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकारSharad Pawar  on Anil Deshmukh :  अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSalil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Embed widget