एक्स्प्लोर

राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदा झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं.

CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी लोकसभेच्या निवड़णुकीत आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदादेखील झाल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. पण विधानसभेला (Vidhansabha) त्यांच्यासमोर देखील प्रश्न होता. त्यांचा महाराष्ट्रात वेगळा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे राज ठाकरे यांना देण्यास जागा नव्हत्या. कारण आम्ही तीन पक्ष होतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही सगळी वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेऊ 

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे प्रवाहाच्या विरोधात लढून देखील त्यांना चांगली मते मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मते मिळाली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य आहे, तिथं त्यांच्यासोबत एकत्र येण्याचा आम्ही विचार करु असेही फडणवीस म्हणाले. 

राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीडी सह्याद्रीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. आमचे विचार जुळतात असे देखील फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळं आता राज ठाकरे सरकारमध्ये सामील होणार का? पुढच्या काळात होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा प्ल्रन देखील सांगितला आहे. पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  यामुळं कायम दुष्काळमुक्त होईल असे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. 2030 मध्ये 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल असंही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळं रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल असेल असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्री झालात, पुढे काय करणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले माझा 2 महत्वाच्या गोष्टींवर भर असणार

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget