एक्स्प्लोर

Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं

Devendra Fadnavis missing link महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मिसिंग लिंक पुलाच्या मजबुती आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वाची माहिती दिली.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'मिसिंग लिंक' (Missing link) या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. तत्पूर्वी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचं त्यांनी म्हटलं. जे स्वप्न आम्ही मुंबई-पुणे प्रवास (Express way traffic) करणाऱ्यांनी बघितलं होतं हे पूर्ण झालंय. सध्या प्रकल्पास 'मिसिंग लिंक' म्हटलं जातंय, पण या ला मिसिंग लिंक नाही तर 'कनेक्टिटिंग लिंक' नाव द्या, याला नाव जे द्यायचं ते ठरवणार आहोत. पण, गायकवाडजी तुम्ही 'मिसिंग लिंक' नाव बदला. कारण, नथिंग इज मिसिंग असे म्हणत फडणवीसांनी या प्रकल्पास 'कनेक्टींग' लिंक असं नवं नाव दिलंय. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल जनतेची माफी देखील मागितली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मिसिंग लिंक पुलाच्या मजबुती आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यापूर्वी आलेल्या निसर्ग या चक्रीवादळाचा वेग सुमारे 130 किमी प्रतितास होता, तर सद्यस्थितीत पुलाची रचना 240 किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा केबल-स्टे पूल आंतरराष्ट्रीय इंजिनिअरींगचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पात एकूण सात देशांचा सहभाग होता. पुलाचे डिझाइन कॅनडामध्ये तयार करण्यात आले, तर काही महत्त्वाच्या चाचण्या डेन्मार्कमध्ये पार पडल्या. केबलचे उत्पादन मलेशियामध्ये झाले, अग्निशमन सुरक्षेच्या चाचण्या स्पेनने केल्या, पुलाचे आलेखन तैवानमध्ये करण्यात आले, आणि केबल तज्ञ सिंगापूरमधून सहभागी झाले होते.

24 तास सीसीटीव्ही, सुरक्षेला प्राधान्य (Missing link to connecting link)

पुलाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 24 तास सीसीटीव्ही देखरेख, विशेष व्हेंटिलेशन प्रणाली यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच लेन शिस्त पाळणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन केल्यास चलान आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्य सरकार आणि परदेशी सल्लागार या दोघांनाही विविध अडथळे आले, मात्र सर्व अडचणींवर मात करत प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या कामासाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण टीमचे फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, हा प्रकल्प अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरेल, असेही त्यांनी म्हटले. हा पूल केवळ वाहतूक सुलभ करणार नाही, तर मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये जागतिक दर्जाची भर घालणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्‍यांनी मागितली माफी (Devendra Fadnavis mumbai pune traffic)

मला माफी मागायची आहे, आज मुंबई पुणे 'एक्सप्रेस वे'वर ट्रॅफिक जाममध्ये अनेकजण अडकले, त्यांना त्रास सहन करावा लागला, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी प्रवाशांची माफी मागितली. तसेच, सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ आला, सुप्रियाताई आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहात, आत्ता तुम्ही कधीच पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत. तुमच्या सरकारने जे काम थांबवलं होतं, ते काम आमच्या सरकारने पूर्ण केलंय, असे म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोलाही लगावला. दरम्यान, आज कामगार दिनी मजुरांच्या श्रमामुळेच हे शक्य झालंय, आज धन्यवाद मानतो. त्यांच्या श्रमामुळे आज हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला, असेही फडणवीसांनी म्हटले. 

हेही वाचा

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget