एक्स्प्लोर

Shivsena : ठाकरे गटाला आधीच कुणकुण, अखेरच्या क्षणी डाव पलटला, छ. संभाजीनगरमध्ये देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार, पण अपक्षाने इज्जत राखली

Chhatrapati Sambhajinagar Jalna Vidhan Parishad : देवयानी डोनगावरकर या माघार घेणार असल्याची माहिती आधीच ठाकरे गटाला मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या गटातून एक अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. 

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषद निवडणुकीसाठा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. परंतु त्याची आधीच कुणकुण लागलेल्या ठाकरे गटाने गणेश लोखंडे यांचा अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीने आता गणेश लोखंडेंना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. 

छत्रपती संभाजीनगर जालना विधानसभेची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. त्या ठिकाणी पक्षाने देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी दिली. मात्र अर्ज माघारी घ्यायच्या काही मिनिटे आधीच देवयानी डोनगावकरांनी त्यांच्या अर्ज माघार घेतला. कोकण विधान परिषदेप्रमाणेच इथेही ठाकरेंच्या उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्ज माघार घेत स्वतःच्या पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न केला.

Ganesh Lokhande Chhatrapati Sambhajinagar : अपक्षाला पाठिंबा

ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे यांनी देवयांनी डोनगावकरांच्या नावाची घोषणा केली होती. देवयानी डोनगावकरांचा अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित होते. मात्र डोनगावकरांनी ऐनवेळी त्यांचा अर्ज मागे घेत ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, देवयांनी डोनगावकर या त्यांचा अर्ज माघार घेणार याची कुणकुण आधीच ठाकरे गटाला लागली होती. त्यामुळेच ठाकरे गटाकडून गणेश लोखेंडे यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. आता देवयांनी डोनगावकरांनी त्यांचा अर्ज माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीने गणेश लोखेंडे यांना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Election : भाजपकडून सुहास शिरसाट रिंगणात

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला आल्यानंतर त्या ठिकाणी सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनीदेखील अर्ज भरत बंडखोरी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी गेली. त्यानतंर त्यांनी समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुहास शिरसाट यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाल्याचं चित्र आहे. 

कोकणमध्ये ठाकरेंना धक्का

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली. बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकण विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. पक्षविरोधी कारवाईत सहभागी झाल्याबद्दल ही हकालपट्टी करण्यात आली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कारवाईचे आदेश असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा:

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Shiv Sena Symbol Case : शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget