Chhagan Bhujbal : संजय राऊत म्हणाले वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं गाडलीत, छगन भुजबळांना हसू आवरेना, म्हणाले, गाडली असतील तर बाहेर काढा..
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल सोलापूरकर यांचं शिवाजी महाराजांच्या बाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ यांनी राज्यपालपदाची चर्चा, राहूल सोलापूरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य, खासदार संजय राऊत यांचा वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये पुरलेल्या कामाख्या देवी मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांच्या शिंगांबाबतच्या दाव्यावर भाष्य केलं. वर्षा बंगल्यावर शिंगं पुरली असतील तर ती बाहेर काढा, असं छगन भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला राज्यपालपद ऑफर करण्यात आलेलं नाही. मी सर्वसामान्यांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा माणूस आहे.मला त्यांच्यावर संकट येतं, अडचणी येतात त्यावेळी पुढं राहून लढावं लागतं. जर मी अशी पदं घेतली, राज्यपाल पद मोठंच आहे, पण तशी पद घेतली तर मी कुणासाठी भांडू शकणार नाही. त्यापेक्षा मागासवर्गीयांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
वाटेल ती विधानं सुरु, भुजबळांचा राहुल सोलापूरकरांवर निशाणा
राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेबाबतच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या लोकांना वेड लागलंय का काय लागलंय,हे कोण आहेत. औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात, औरंगजेबाकडे सगळ्या देशाचं राज्य होतं त्याला कोण लाच देऊ शकतं, वाटेल ती विधान सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा येथील तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळं काम करुन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा तो भाग आहे तिथून ते आग्रा येथून सुटले. तुम्ही म्हणता तसं असतं तर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आरामात आले असते. महाराजांनी संभाजी महाराजांना काशीला सोडून दिलं. एकटे महाराज रायगडावर आले त्यावेळी राजमाता जिजाऊ विचारतात शंभूराजे कुठं आहेत? यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं, हा इतिहास आहे. इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण, असं छगन भुजबळ म्हणाले.
शिंगं गाडली असतील तर ती बाहेर काढा : छगन भुजबळ
संजय राऊत यांनी वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीच्या येथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांची शिंगं गाडून ठेवलेली आहेत, अशी चर्चा असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात विचारलं असता छगन भुजबळ यांना हसू आवरलं नाही. ते पुढं म्हणाले, ठीक आहे मी काय सांगू शकत नाही, कुठं गाडलेत, ती काढा म्हणावं बाहेर, कुणी तरी बाहेर बोललं असेल. मला काही माहिती नाही. मी त्याबाबत अधिक बोलणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
हायकोर्टानं निवडणूक प्रक्रियेबाबत जे म्हटलंय त्याचं उत्तर शासन देईल. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दुपारच्या वेळी केंद्राकडे कुणी फिरकत नाही.चार पाचनंतर जी गर्दी उसळते, ते दरवाजे लावून घ्या, कूपन द्या, मग त्या लोकांचं मतदान 8 ते 9 वाजेपर्यंत चालतं. शेवटच्या तासांमध्ये मतदान वाढत असा अनुभव आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
इतर बातम्या :























