Chhagan Bhujbal on Ajit Pawar : अजितदादांच्या 'त्या' शपथविधीची कल्पना नव्हती, पळून गेलेल्या आमदारांना आणण्यासाठी प्रयत्न केले : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal on Ajit Pawar, Nashik : बारामतीची निवडणूक होऊन एकदाची होऊन गेली, याचा आमच्या सारख्याला आनंद आहे.
Chhagan Bhujbal on Ajit Pawar, Nashik : बारामतीची निवडणूक होऊन एकदाची होऊन गेली, याचा आमच्या सारख्याला आनंद आहे. कारण पवार कुटुंबात निवडणुकीवरुन आरोप - प्रत्यारोपांचे कलगीतुरे रंगले. हे काही आनंददायी चित्र नव्हते. याने वार केला की, त्याने प्रतिवार करायचा. राजकीय जरी आपण म्हटलं तरी कुटुंबावर परिणाम होतात ,अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. ते नाशिकमधील येवला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत होते.
ऑक्टोबरमधील शपधविधीची कल्पना मलाच नव्हती
पुढे बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, अजितदादांच्या (Ajit Pawar) ऑक्टोबरमधील शपधविधीची कल्पना मलाच नव्हती, उलट मी आणि समीर भुजबळांनी पळून गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. तर महायुतीच्या उमेदवारांसाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करीत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. पवार कुटुंबियांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा आहेच.
वार-प्रतिवार झाले याबद्दल नक्कीच मला खंत
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मतदान कमी झाले यावर माध्यमांनी पाहावे. पवार कुटुंबात निवडणूक झाली याची तुम्हाला खंत वाटते. कुटुंबातील लोकांवरच वार-प्रतिवार झाले याबद्दल नक्कीच मला खंत आहे. 30 वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलं आहे. यापूर्वीही पवार कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांविरोधात लढाई झालेली आहे. गांधी कुटुंबातही असे संघर्ष झाले आहेत. काही ठिकाणी आज बहिण-भाऊ लढत आहेत, मात्र यापूर्वी असे प्रकार घडला नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
2004 मध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळू शकले असते. पण त्यावेळची संधी शरद पवारांनी कशामुळे गमावली, हे अजूनही गुढ आहे. त्याबद्दल आम्ही पवार साहेबांना विचारले, पण त्यांनी प्रत्युत्तर देण्याचे टाळले. मुख्यमंत्रीपदाची संधी आली तेव्हा अजित पवार हे मुख्यमंत्री झाले नसते तर छगन भुजबळ वा आर. आर. पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळाली असती असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पटेल यांच्याशिवाय, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी आजवर 2004 च्या सत्तेस्थापनेविषयी भाष्य केलं आहे. मात्र, अद्याप शरद पवारांकडून (Sharad Pawar) कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
लोकसभेला 4 जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु, अजितदादांच्या खास नेत्याने फॉर्म्युला सांगितला