Chhagan Bhujbal: अजित पवारांशी बोलायची गरज नाही; छगन भुजबळ संतप्त, अधिवेशन सोडून नाशिककडे रवाना
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला रवाना झाले आहे.
Chhagan Bhujbal: मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज उघडपणे नाराजी जाहीर केली आहे. मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली गेली...भुजबळ कधी संपला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभा सभागृहाचं पहिल्या दिवसांचं कामकाज स्थगित करण्यात आलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आता छगन भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिकला रवाना झाले आहे.
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार-
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होतील. छगन भुजबळांनी आज सभागृहात हजेरी लावली. मात्र उद्यापासून छगन भुजबळ मतदारसंघात असणार अशी माहिती मिळत आहे. यावेळी नाशिकमध्ये समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन छगन भुजबळ भेटणार आहेत. या भेटीमध्ये ते समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहे.
मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं...- छगन भुजबळ
होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो. मंत्रिपदं आली- गेली...भुजबळ कधी संपला नाही, असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं. तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (NCP Cabinet Minister List)
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना वगळले-
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाने केला. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (अजित पवार गट), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट), अनिल भाईदास पाटील (अजित पवार गट) आणि संजय बनसोडे (अजित पवार गट), सुधीर मुनगंटीवार (भाजप), रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे (भाजप), डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि दीपक केसरकर (शिंदे गट), तानाजी सावंत (शिंदे गट), अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांचा समावेश आहे.