एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर लढा अस्मितेचा आणि अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

येवला : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर आज छगन भुजबळ यांनी येवल्यातील (Yeola) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे. 

येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते. विशेष करून मराठा समाजाचे आभार. या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला. 160 किलोमिटर लांबून पाणी आणलं. मला मते देतील असे वाटत होते. मात्र काही मंडळी चक्करमध्ये पडली. मला कोणाबद्दल अजिबात राग नाही. पाण्याचा प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही, तो पूर्ण करायचा आहे. ज्यांनी मते दिली नाही त्यांनाही अजून जास्त पाणी द्यायचे आहे, तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्यायचे आहे. आपल्याला एकत्रित काम करायचे आहे. नगर परिषद, जिल्हा, पंचायत समिती यात आपण आपली ताकद दाखवून देणार आहे, असे त्यांनी म्हटले. 

सगळ्यांना सोबत घेवून आपल्याला काम करायचंय

लोकांचे लक्ष आपल्याकडे आहे. कोणाबद्दल नाराजी नाही. ज्यांनी यावेळी मते नाही दिली ते पुढच्या वेळी परत दिली. आपण परत कामाला लागायचे आहे. सगळ्यांना सोबत घेवून आपल्याला काम करायचे आहे. येवला - लासलगाव मतदार संघ एकसंघ ठेवायचा आहे. सर्वांची दिलेली आश्वासने मी पूर्ण करणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण करायचे आहे, विकास कधीही थांबत नाही. मंत्री येतात, मंत्री जातात. मला अनेक वेळा मंत्रीपदे मिळाली. 1991 मध्ये मी महसूलमंत्री पद घेतले. 93 मध्ये गृहमंत्रीपद घेतले. ज्यावर आता भांडणे सुरू आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी पवारांनी मला बसवले, त्यांची अपेक्षा पूर्ण केली. मला बंगल्यावर ठार मारायचा प्रयत्न झाला. त्यावेळी काँग्रेस एकत्र तर राहिली असती तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते.

शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री केलं

यानंतर शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो. मला मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी कोणाचाच पत्ता नव्हता, मी आणि शरद पवार आम्ही दोघेच होतो. शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिले, गृहमंत्री बनवले. 'टाडा' त्यावेळी जोरात होता, मी गृहमंत्री झालो. दाऊदचे कोणी नाव घेत नव्हते, छगन भुजबळांनी त्याचे नाव गृहमंत्रीपदी असताना घेतले होते. बेळगाव सत्याग्रहाला बाळासाहेब ठाकरे यांनी मला पाठवले होते. कर्नाटकात शिवसेनेचा राग होता. सगळीकडे चेकिंग सुरू होती, मी मुंबईत आलो. चेहऱ्याला दाढी लावली, हाती शबनम घेतली आणि गोव्याला गेलो. मुस्लिम माणसाचा पेहराव करून घेतला. गोव्यात काही कार्यकर्ते भेटले, तेथून मी कर्नाटकमध्ये गेलो. ज्या ज्या वेळी आदेश झाला त्यावेळी मी काम केले, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या कार्याचा आलेख समर्थकांसमोर मांडला. 

सगळ्यांच्या चर्चा होतात मग आपल्या का नाही?

लोकसभा निवडणुका लागल्या, अजित दादा पवार यांनी मला बोलवले. मी लोकसभेचे तिकीट मागितले नव्हते, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. त्यावेळी अमित शहा यांनी सांगितले की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी. तीन आठवडे नाव जाहीर केले नाही.  त्यानंतर मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. अजित पवार बोलले भुजबळांनी घाई केली, मग इतके दिवस का नाही सांगितले? मी दूध पिता बच्चा आहे का? मला कळत नाही. त्यानंतर आमचा उमेदवार पडला. मी राज्यसभेवर जातो, ४० वर्ष झाले असे मी बोललो. मात्र अजित दादांच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे वहिनीला राज्यसभेवर पाठवले. साताराची जागा आम्ही भाजपला सोडली. त्याबदल्यात पियूष गोयल यांची जागा आम्हाला मिळणार होती. मकरंद पाटील यांच्या भावाची जागा मला द्या. मात्र मी शब्द दिला आहे असे मला सांगितले. सगळ्यांच्या चर्चा होतात मग आपल्या का नाही?  त्यानंतर मग मी येवल्यात येवून आमदारकी लढवली, असेही त्यांनी म्हटले.

कसला वादा, अन् कसला दादा

आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग?  दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय. 

मी पुन्हा उभा राहील

ते पुढे म्हणाले की, हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे, लढा अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, लोकशाही आहे. पटेल, तटकरे यांचे कॉल पण ते ऐकत नसल्याचे सांगितले. फडणवीस देखील अजित पवारांना बोलले, भुजबळांना मंत्री करा. पण त्यांनी ऐकले नाही. सरकारी पक्षात असल्याने बोलता येत नाही. जे झाले ते लोकांच्या कानावर टाकणे गरजेचे आहे. विविध पक्षातील लोक नाराज झाले, पण दादांचा वादा महत्त्वाचा आहे. मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. उद्या समता परिषद मेळावा आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. कोणीही खचून जावू नका, निराश होवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.  

आणखी वाचा 

छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Embed widget