एक्स्प्लोर

Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण

Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांचे कौतुक केले आहे.

Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (Savitribai Phule jayanti) साताऱ्याच्या नायगावातील कार्यक्रमात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले.  या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे कौतुकही केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नायगावात सुरू झाला होता. छगन भुजबळ हे दरवर्षी नायगावात येतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला. नायगाव येथील कार्यक्रमात जाताना देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीने प्रवास केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. 

भुजबळांकडून फडणवीसांचे कौतुक

यानंतर झालेल्या सभेत छगन भुजबळ म्हणाले की,  हरी नरके इथे मला घेऊन आले आणि सांगितले की या पडक्या वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला आहे. त्यानंतर इथे स्मारक उभारायचे आम्ही ठरवले. मी त्यावेळी विधानपरिषदेचा आमदार होतो. तो निधी इथे वापरायचे ठरवले. सावित्रीबाईंना शेणाचे गोळे तुम्ही आणि सगळ्यांनी मारले, फक्त ब्राम्हणांनी नाही. फुलेंना काही ब्राम्हणांनी जसा विरोध केला तसा काहींनी मदतही केली. ज्या वाड्यात पहिली शाळा सुरु झाली ते भिडे ब्राम्हणच होते. देवेंद्रजी तुम्ही सावित्रीबाईंचे काम पुढे नेत आहात, म्हणून तुमचे धन्यवाद. विधीमंडळाच्या सभागृहाच्या समोर फुलेंची प्रतिमा लावण्याचे, महाज्योतीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्याचे काम तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी केले. भिडे वाड्याचे काम सुरु झालंय. मात्र कामाला धक्का देण्याची गरज आहे. सावित्रीबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बंद आहे. तो पुन्हा सुरु व्हावा. वाकिफ कहाँ जमाना हमारी उडान से, वो और थे जो हार गए आसमान से, असे शेरोशायरी त्यांनी यावेळी केली. 

फडणवीसांकडून शेरोशायरीतून भुजबळांचे कौतुक

भुजबळांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून शेरोशायरी करत त्यांचे कौतुक केले. "मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया", अशा प्रकारे तुम्ही काम सुरु केले त्यानंतर हळूहळू कारवाँ बनायला लागला आणि काम पुढे जायला लागले. आज एक चांगले स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पण मी तुमचे याकरिता अभिनंदन करेल की, या ठिकाणी प्रेरणास्थळ झाले पाहिजे हे तुम्ही ओळखले आणि त्याची सुरुवात तुम्ही केली. यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचे कौतुक केले. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
Embed widget