100 कोटींचं घबाड, 40 लाखांची कॅश, किलोंमध्ये सोनं, नोटा मोजून थकले अधिकारी, कोण आहे हा 'कुबेर'
हैदराबाद : तेलंगणामधील एका सरकारी बाबूकडून कोट्यवधींचं घबाड जप्त करण्यात आलेय. एसीबीने (Anti Corruption Bureau) तेलंगणातील सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी केली.
हैदराबाद : तेलंगणामधील (telangana) एका सरकारी बाबूकडून कोट्यवधींचं घबाड जप्त करण्यात आलेय. एसीबीने (Anti Corruption Bureau) तेलंगणातील सरकारी अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यलायात छापेमारी केली. यामध्ये मिळालेला काळं धन पाहून एसीबीचे अधिकारीही हैराण झाले. त्या अधिकाऱ्याच्या घरात 100 कोटी रुपयांचं घबाड मिळालं. 40 लाखांची कॅश जप्त करण्यात आली. त्यानंतर सोनंही ताब्यात घेण्यात आलेय. एसीबीच्या (ACB) पथकाने ज्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा मारला त्याचं नाव एस बालकृष्ण असं आहे. त्याच्या घरात मिळेलेली रक्कम मोजता मोजता एसीबीचे अधिकारीही थकले.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणामधील रियल इस्टेट नियामक प्राधिकरण (टीएसआरईआरए) मंडळाचे सचिव आणि मेट्रो रेलमध्ये योजना अधिकारी असलेल्या एस. बालकृष्ण यांच्या घरी आणि परिसरात छापेमारी केली. यादरम्यान एसीबीने 100 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. एस. बालकृष्ण याआधी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एचएमडीए) मध्ये टाउन प्लानिंगमध्ये कार्यरत होते. एसीबीने मिळालेल्या माहितीच्या आधारावर बालकृष्ण यांच्या घरी धडक कारवाई केली.
किती रक्कम मिळाली ?
लाचलुचपत प्रतिबंधक संस्था (ACB) म्हणजेच एसीबीच्या 14 पथकांनी बुधवारी एस. बालकृष्ण यांच्या घरी छापेमारी केली. बुधवारी दिवसभ त्या अधिकाऱ्याच्या घरी झाडाझडती सुरु होती. आजही पुन्हा तपास करण्यात येणार आहे. आरोपी अधिकारी बालकृष्ण यांच्या घरी, कार्यलयात आणि नातेवाईकांच्या घरी एकत्र छापेमारी करण्यात आली. यामध्ये एसीबीने तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये 40 लाख रुपये रोख रक्कम, 2 किलो सोनं, संपत्तीची कागदपत्रे, 60 महागडी घटाळे, 14 मोबाईल, 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
नोटा मोजण्याची मशीन अन् 4 लॉकर -
आरोपी अधिकारी एस. बालकृष्ण याच्याकडे चार बँक लॉकर असल्याचं एसीबीच्या तपासात उघड झाले. त्या लॉकरमध्ये संपत्तीची माहिती मिळाली आहे. एसीबीने आतापर्यंत चार बँक लॉकरचा तपास सुरु केलाय. त्याशिवाय बालकृष्ण यांच्याकडे नोटा मोजण्याची मशीनही मिळाल्या आहेत. एचएमडीएमध्ये काम करताना त्यांनी अवैध्यरित्य संपत्ती जमा केली होती. त्यांच्याकडे आणखी संपत्ती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी वाचा :
सोलापुरातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकावर गुन्हा दाखल, बँकेत फसवणूक केल्याचा आरोप