एक्स्प्लोर

Buldhana News: युतीचा प्रस्ताव देऊनही प्रतिसाद नाही; बुलढाण्यात महायुतीची शक्यता मावळली? आमदार संजय गायकवाडांची स्पष्टोक्ती

Buldhana News बुलढाण्यात आगामी निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य करत या विषयावर भाष्य केलंय

Buldhana News : बुलढाण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य करत या विषयावर भाष्य केलंय. यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही. कारण नुकतीच बुलढाण्यातील उमेदवाराला भाजपने मान्यता दिली आहे.

उबाठा (Shivsena UBT) आणि काँग्रेसचही (Congress) ठरलं आहे. मात्र त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही. आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत, मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही. जिल्ह्यात अद्याप युतीची चर्चा नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्याप चर्चा कुणाकडूनच नाही. असे ते म्हणाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत एकी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Bhandara : भंडाऱ्यात ठाकरेंची शिवसेनेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत

भंडारा जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व एकत्रित पक्षांनी आघाडीत निवडणूक लढवावी, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, आम्हाला जर अन्य पक्षांचा सहकार्य मिळालं नाही. तर, आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी दिली. भंडाऱ्याच्या काही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तयारी झाली असून आघाडीची वाट नं बघता त्यांचे उमेदवारी अर्ज दाख करणार असून मुंबईत ठाकरे बंधूंचा ब्रँड चालतो. त्यामुळं मुंबई महापालिकेवर नक्कीच गवा फडकेल, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी व्यक्त केला आहे.

Bhandara News : भंडारा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची घोषणा

भंडारा नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी जयश्री बोरकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जयश्री बोरकर या भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष असून माजी नगरसेविका आहेत. तर, भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मधुरा मदनकर यांच्या नावाची घोषणा भाजप नेते परिणय फुके यांनी केली. मधुरा मदनकर या भंडारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका राहिलेले आहेत. भंडाऱ्यात सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असून उर्वरित पक्षांच्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदांच्या उमेदवारांची घोषणा आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar VIDEO: यापुढे आम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली, माझ्या मुलाचा अर्ज मागे घेतो; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचा नूर पलटला
यापुढे आम्हाला त्रास होणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिली, माझ्या मुलाचा अर्ज मागे घेतो; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचा नूर पलटला
कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, मुलीचा अर्ज माघे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट
कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, मुलीचा अर्ज माघे घेतल्यानंतर महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Abhishek Banerjee : मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget