एक्स्प्लोर

Suresh Dhas : आम्ही सध्या मोकळेच, इतक्यात कामाला लागू नका नाही तर थेट दवाखान्यात जावं लागेल; आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्त्यांना मिश्किल सल्ला

Beed News : आमच्या तयारीला लागलेल्या लोकांचे कंबरडे मोडले. इतक्या लवकर कामाला लागू नका, नाही तर दवाखान्यात जावे लागेल, असा सल्ला भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

Beed News : बीड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका (Beed Zilla Parishad and Panchayat Samiti Elections) आता थेट एप्रिल महिन्यात गेल्या असल्यानं आम्ही सध्या मोकळेच आहोत. आमच्या तयारीला लागलेल्या लोकांचे कंबरडे मोडले. जे अती तयारीला लागले त्यांनी हळूहळू तयारी करा. इतक्या लवकर कामाला लागू नका, नाही तर दवाखान्यात जावे लागेल, असा सल्ला भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यांच्या या मिश्किल सल्ल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आष्टी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना धस (Suresh Dhas) यांनी कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला.

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी कृषी सहाय्यकांबाबत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे सांगितलं. ज्या अधिकाऱ्यांच्या जास्त तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस लावण्याच्या सूचनाही धस यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Beed News : बीडच्या कडा येथील महेश सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला मेळावा

बीडच्या आष्टीतील कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत झाल्यानंतर नुकताच पहिला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. साखर कारखान्याच्या परवान्यावरून आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र धोंडे यांच्या पाठपुराव्यानंतर साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत झाला आहे. नुकताच याच कारखाना परिसरात आधुनिक ऊस लागवडीचे तंत्र यावर चर्चासत्र भरविण्यात आले. कारखान्याचा परवानापूर्वक झाल्यानंतर लवकरच हा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केला जाणार आहे. दरम्यान कृष्णा खोऱ्यातील पाच टीएमसी पाणी आष्टी तालुक्यासाठी मिळणार असल्याने या परिसरात एकही गुंठा क्षेत्र कोरडवाहू राहणार नाही असा विश्वास धोंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Beed Crime : बीडमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

बीडमध्ये मारहाण दहशतीच्या घटना सुरूच आहेत. काल रात्री बीड शहरात सहा ते सात जणांच्या टोळक्याने सुभाष हुंबरे नामक व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात हुंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयात सुभाष हुंबरे बसले असताना अचानक सहा ते सात जणांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बंदुकीच्या मुठीने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना हल्लेखोरांकडे असलेली एक बंदूक आढळून आली. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget