भाजप आज उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची करू शकते घोषणा, जाणून घ्या कोणत्या नावांची आहे चर्चा
Vice President Election: देशात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत भाजप आज संसदीय मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ शकते.
Vice President Election: देशात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत भाजप आज संसदीय मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. अशातच आता उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी देऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. याशिवाय केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शीख चेहरा कॅप्टन अमरिंदर आणि नजमा हेपतुल्ला यांच्या नावांचीही चर्चा आहे. याशिवाय पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्या नावावरही विचार केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. आज भाजपच्या बैठकीत कोणाच्या नावात शिक्कामोर्तब होतोय हे पाहावं लागणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कधी आहे?
देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आहेत. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. पुढील उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू झाली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे. गरज भासल्यास 6 ऑगस्टला निवडणुका होतील. म्हणजेच एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यास उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार. त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Monsoon Session : मोदी सरकार आणणार 24 नवीन विधेयके; सहकार क्षेत्रातील सुधारणा, डिजिटल मीडियाशी संबंधित विधेयकांचाही असेल समावेश
India : 52 टक्के विधानपरिषद आमदारांवर गुन्हे; त्यातील 15 टक्के गंभीर; ADRचा रिपोर्ट
Bundelkhand Express : PM मोदींकडून 14,850 कोटी रुपये खर्चाने बांधलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन! पाहा क्षणचित्रे