एक्स्प्लोर

Pankaja Munde: पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लीप व्हायरल, बंजारा समाजाच्या मतावर भाष्य, बीडमध्ये नेमकं काय घडणार?

Maharashtra Politics: पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. रविकांत राठोड यांच्यासोबतच्या पंकजा मुंडे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा

बीड: भाजप नेत्या आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारासोबतचा ऑडिओ कॉल व्हायरल झाला आहे. बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod) यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. एवढेच नाही तर बंजारा समाजाची (Banjara Community)  मतंही मलाच मिळणार आहेत. मात्र, त्यातले दहा पाच हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असेही यावेळी पंकजा मुंडे ऑडिओ क्लीपमध्ये म्हणताना ऐकायला येत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत (Audio Clip) अद्याप पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. 

बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला असताना रविकांत राठोड यांनी त्यांना सहकार्य करण्यासंदर्भात बोलत असतानाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.ही उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात उमेदवाराला विनंती करत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन सुद्धा दिला आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या संदर्भातील तुमच्या त्या कामाला मी मदत करेल, असं म्हणून पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना मदत करण्यासंदर्भात आवाहन केले आहे.

रविकांत राठोड हे आधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र, बीड लोकसभेसाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात ते आता काम करत आहेत.

काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिरही कॅन्सल करेल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; बीडच्या सभेत विरोधकांवर निशाणा

बीडमध्ये मोदींची सभा

बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचे आव्हान आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. यानंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. बीड लोकसभेसाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा चांगलाच प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर बीड लोकसभेची गणित बदलणार का, हे आता पाहावे लागेल.

आणखी वाचा

निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget