एक्स्प्लोर

BJP Vs Shivsena: आम्ही बापाच्या दोन नंबरच्या पैशावर उडत नाही, आमच्या नादी लागलात तर... भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सदा सरवणकरांच्या मुलाला सुनावलं

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटात माहीममध्ये वाद उफाळून आला आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांच्यावर अत्यंत तिखट भाषेत टीका केली आहे.

मुंबई: देशाचा विकास आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सध्या एकदिलाने वाटचाल करत असल्याचे प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन तर सोडाच पण प्रचंड वितुष्ट असल्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. याचाच प्रत्यय आता मुंबईत येताना दिसत आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाग असलेल्या माहीम विधानसभा मतदरासंघात शिंदे गट (Shivsena Shinde Camp) आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. भाजपच्या माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यावर घणाघाती भाषेत टीका केली आहे.

समाधान सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेतील शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. समाधान सरवणकर आणि त्यांची बहीण प्रिया सरवणकर यांचे स्थानिक पातळीवर अक्षता तेंडुलकर यांच्याशी वाद आहेत. याच वादाचा आता भडका उडाला आहे. अक्षता तेंडुलकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून अक्षता तेंडुलकर यांनी प्रिया सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावर जळजळीत भाषेत टीका केली आहे. हिंदुत्व आणि मोदींजींसाठी आम्ही काम करतो. बापाच्या दोन नंबरच्या पैश्यावर आणि पदावर आम्ही नाही उडत, आणि युतीधर्म फक्त भाजप पाळणार, अशा गैरसमजात अजिबात राहू नका. आमच्या नादी लागलात तर आरे ला कारे करायला आम्हाला चांगलंच जमतं, असे अक्षता तेंडुलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माहीममध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर आता सदा सरवणकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माहीमधील या वादाचा फटका आता दक्षिण मध्य मुंबईतील शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा वाद लवकरात लवकर मिटवण्याचे प्रयत्न होतील.

समाधान सरवणकर यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात

समाधान सरवणकर यापूर्वी 2022 मध्ये गणेशोत्सवाच्या काळात ठाकरे गटाशी झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. त्यावेळी दादर परिसरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकांच्या स्वागतासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारी ठाकरे गटाकडूनही एक मंच उभारण्यात आला होता. त्यावेळी समाधान सरवणकर यांनी 'म्याव म्याव' असा आवाज काढत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचले होते. त्यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला होता. काही दिवसांनी हा वाद पुन्हा उफाळून आला होता. हे प्रकरण पोलिसांत गेले. त्यावेळी सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून पोलिसांदेखत गोळीबार केला होता. हे प्रकरण तेव्हा चांगलेच गाजले होते. 

BJP Vs Shivsena: आम्ही बापाच्या दोन नंबरच्या पैशावर उडत नाही, आमच्या नादी लागलात तर... भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने सदा सरवणकरांच्या मुलाला सुनावलं

आणखी वाचा

बंदूक सदा सरवणकर यांचीच, पण गोळी अन्य व्यक्तीने झाडली; पोलिसांचा अहवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget