एक्स्प्लोर

नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली निवडणुकीची तारीख

नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्यावीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे.

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने आता राजकीय पक्ष मैदानात उतरले असून पक्षाचे मेळावे, बैठका आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. नाशिक येथे आज भाजपच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका असे स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संधी म्हणून वाट पाहणाऱ्या भाजप (BJP) कार्यकर्त्यांना आता आपलं तिकीट फिक्स करण्यासाठी मैदानात उतरुन काम करावे लागणार आहे. 

नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्यावीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करुन ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत, त्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकांची तारीखच जाहीर केली. ही कार्यशाळा मोदींच्या 11 वर्षाची कारकीर्द सांगण्याची आहे. आगामी निवडणुकीत एक-एक मत महत्वाचं आहे, कमळ चिन्हावर लढणाऱ्याला एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही हा संकल्प आम्ही घेतला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफ हे निर्णय आपल्या सरकारने घेतले होते. आता, 15 ऑगस्टला स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लागेलंच, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीखच सांगितली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत 'सिंदूर'चा बदला घेतला, तो दुसऱ्या सरकारनं घेतला नसता, असेही यावेळी बावनकुळेंनी म्हटलं. 

गिरीश महाजनांकडून 100 प्लसचा नारा

नाशिक महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी 100 प्लसचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकांसाठी युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा महाजन यांनी पक्षाच्या मेळाव्यात दिला आहे. नाशिकमध्ये आयोजित भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत गिरीश महाजन यांनी महायुतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. गटबाजी थांबून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा अशा सूचनाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे येथील सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याने काहींच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा

सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
Embed widget