एक्स्प्लोर

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील मोठ्ठी कॅडबरी घेऊन दानवेंच्या केबिनमध्ये, उद्धव ठाकरेंच्या अचानक भेटीने दादा अवाक, अनिल परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टने प्रवास. लोकसभा निवडणुकीनंतर जुन्या मित्रांमधील संवादाचे दरवाजे उघडे?

मुंबई: महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद  चित्र पाहायला मिळाले.  संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलेमोठे चॉकलेट दिले. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) हेदेखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील दालनात येताच या सर्व नेत्यांमध्ये हसतखेळत संवाद सुरु झाला. चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास

आज विधिमंडळात एकाहून एक धक्कादायक घटनांचा सिक्वेन्स पाहायला मिळाला. विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील तोंडदेखला का होईना पण झालेला संवाद हा महत्त्वाचा मानला जात आहे.

कोण कोणाला डोळा मारतंय, उद्धव ठाकरे म्हणाले....

चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे विधानभवातून बाहेर पडले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता उद्धव ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. त्यावर पत्रकारांनी, 'कोण कोणाला डोळा मारतंय, हे कळालं पाहिजे', असे म्हटले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्कीलपणे म्हटले की, मी उद्यापासून गॉगल घालून येऊ का?. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला.

फडणवीसांच्या नावावर फुल्ली: सुषमा अंधारे

उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे,   म्हणजे विषय संपला आहे. काहीही असं नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही. त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असा होत  नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

फडणवीस मोठ्या मनाचे नेते, म्हणून उद्धव ठाकरेंशी बोलले, दुसरा कोणी असता तर...

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टने प्रवास केला यावर बोलताना भातखळकर म्हणाले,    खालच्या स्तरावर जाऊन टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. यातून फडणवीस हे किती मोठ्या मनाचे आहे हे दिसून येते. फडणवीसांच्या जागी दुसरा कोणता नेता असता तर त्याने रिअॅक्शन दिली असती. पण उद्धव ठाकरे हे किती खालच्या पातळीवर जाऊन बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. तरीसुद्धा  आपण आपली मर्यादा आणि सज्जनशीलता सोडायची नसते याचेच एक उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले आहे. अटलजी कायम म्हणायचे की समोरचे विरोधक हे माझे शत्रू नाहीत  विरोधक आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्याच विचारावर चालणारे नेते आहेत, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेले राज्य विधिमंडळाचे अधिवेशन हे सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात राजकीय घटनांचा जबरदस्त सिक्वेन्स पाहायला मिळाला. सुरुवातीला भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमधील भेटीची चर्चा असतानाच कोणालाही अपेक्षित नसलेली आणखी एक घटना घडली. विधानभवनाच्या लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. यावेळी उभय नेत्यांमध्ये जुजबी चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांनीही लिफ्टनेही एकत्रच प्रवास केला. त्यावेळी लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपशील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी समोर आणला आहे. प्रवीण दरेकर हेदेखील उद्धव आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये होते.

प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं.

 त्यानंतर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले  नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

VIDEO:  अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनSambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगेNagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special ReportAmbadas Danve vs Prasad Lad : हातवारे,  शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Embed widget