एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांनी सभागृहात जाहीरपणे मागितली अध्यक्षांची माफी; म्हणाले हवी ती शिक्षा द्या भोगायला तयार, अध्यक्षांनी माफ केलं अन्..., नेमकं काय प्रकरण?

Bhaskar Jadhav: अध्यक्ष महोदय माझ्याकडून जे शब्द बाहेर बोललो गेले, त्या संदर्भात मी माफी मागतो. यावर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्विकारायला तयार आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

मुंबई: अध्यक्षच विधानसभेच्या परंपरा पाळत नाहीत असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी माध्यमांसमोर हल्लाबोल केला होता, आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. अध्यक्ष सभागृहाच्या परंपरा पायदळी तुडवत असून, सरकारला वाचवण्याचं काम करत असल्याचं जाधव म्हणाले होते. विरोधकांच्या हक्कांचं संरक्षण करत नसल्याची टीकाही त्यांनी केली. “महाराष्ट्राच्या विधीमंडळाची संपूर्ण परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे,” असं जाधव यांनी नमूद केलं. त्यावरती आज भास्कर जाधवांनी सभागृहात माफी मागितली आहे.

आमचा गुन्हा आम्ही मान्य करतो

'मी लगेच उठलो, मला माहिती आहे मी कधी उठलो नव्हतो, मला चांगलं माहिती आहे, मी हातवार करून बोलतो, मी जाणिवपुर्वक हातवारे करून बोलतो, मला सस्पेंड करायचं असेल तर करा, जे आहे ते मी सांगतो. आत्ता सुध्दा माझे हात हालत आहेत. आत्ताही आपण राम कदम यांना पुढचा प्रश्न विचारला तर त्यांनी हात पुढे केले. आमचा गुन्हा आम्ही मान्य करतो.अध्यक्ष महोदय माझ्याकडून जे शब्द बाहेर बोलले गेले, त्या संदर्भात मी माफी मागतो. यावर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी स्विकारायला तयार आहे, असंही पुढे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी भास्कर जाधव यांनी जी भावना व्यक्त केली ती मोठ्या मनाने स्विकारावी, असं म्हटलं आहे.

माझी चूक झाली मी ते कबूल करतो

माझ्याकडून माध्यमांसमोर जे शब्द गेले ते जायला नको होते, मी अध्यक्ष महोदय जाहीरपणे सांगतो हे शब्द माझ्याकडून गेले त्याबद्दल हवी ती शिक्षा मला द्या मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे, असंही पुढे भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी अखेर आपली चूक मान्य केली आहे. माझ्याकडून बाहेर जे शब्द गेले ते योग्य नाही, माझी चूक झाली मी ते कबूल करतो आणि मी माफी मागतो, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली आहे, सभागृहानेही भास्कर जाधवांना मोठ्या मनाने माफ केलं.

नेमकं प्रकरण काय?

काल (गुरूवारी) भास्कर जाधव यांनी सभागृहात केलेले हातवारे आणि वापरलेली भाषा, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधकांच्या 293च्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा काही प्रश्न विचारण्याची (राइट टू रिप्लाय) परवानगी अध्यक्षांकडे मागितली. मात्र, चर्चेची सुरुवात ठाकरे यांनी केली होती, आता ते सभागृहात नाहीत, त्यामुळे इतर कोणालाही मी ही संधी देणार नाही, असे सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर आक्रमक होत जाधव अध्यक्षांकडे हातवारे करत जोरदार बोलत होते. जाधव यांच्या या कृतीने शिंदेसेनेचे मंत्री आणि आमदार वेलमध्ये उतरले आणि मोठा गोंधळ झाला होता.

अध्यक्षच विधानसभेच्या परंपरा पाळत नाहीत

आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. अध्यक्ष सभागृहाच्या परंपरा पायदळी तुडवत असून, सरकारला वाचवण्याचं काम करत असल्याचं जाधव म्हणाले. विरोधकांच्या हक्कांचं संरक्षण करत नसल्याची टीकाही त्यांनी केली. “महाराष्ट्राच्या विधीमंडळाची संपूर्ण परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे,” असं जाधव यांनी नमूद केलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget