एक्स्प्लोर

Bhaichung Bhutia : 'निवडणुकीचं राजकारण आपलं काम नाही', दहा वर्षात सहा पराभवानंतर फुटबॉल स्टार बायचुंग भुतियाचा राजकारणाला रामराम

Bhaichung Bhutia Quits Politics : गेल्या दहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीत बायचुंग भुतियाचा सहाव्यांदा पराभव झाल्यानंतर त्याने राजकारणाला अलविदा केला आहे.  

Bhaichung Bhutia Quits Politics : भारतीय फुटबॉट टीमचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने राजकारणाला रामराम केला आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बायचुंग भुतिया याने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीचं राजकारण आपलं काम नाही अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार रिक्षल दोरजी भुतिया यांनी बायचुंग भुतियाचा 4,336 मतांनी पराभव केला. 

'राजकारणात हेतू नेहमीच चांगला होता'

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजकारण आपलं काम नसल्याचं लक्षात आल्याचं बायचुंग भुतिया याने स्पष्ट केलं. सिक्कीमधील क्रीडा आणि पर्यटनाच्या विकासासाठी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकलो नसल्याचं त्याने खेद व्यक्त केला. तसेच राजकारणात आपला हेतू नेहमी चांगलाच होता, पण यश आलं नाही असंही तो म्हणाला. आतापर्यंत आपल्या समर्थकांनी दिलेल्या सोबतीबद्दल त्यांचे आभार मानले आणि या निर्णयामुळे जर कुणाचे मन दुखावले असेल तर त्यांची माफीही बायचुंग भुतिया याने मागितली. 

स्वतःचा पक्ष स्थापन केला

भारताचा फुटबॉल स्टार अशी ओळख असलेल्या बायचुंग भुतियाने 2018 मध्ये स्वतःचा हमरो सिक्कीम नावाचा पक्ष स्थापन केला होता. गेल्या वर्षी त्याचे SDF पक्षात विलिनीकरण करण्यात आलं. भारताच्या माजी फुटबॉलपटूने पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार म्हणून दोनदा निवडणूक लढवली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दार्जिलिंगमधून आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकी सिलीगुडीमधून त्याचा पराभव झाला.

त्यानंतर बायचुंग भुतियाने सिक्कीममध्ये हमरो सिक्कीम पक्षाची स्थापना केली. 2019 ची विधानसभा निवडणूक त्याने गंगटोक आणि तुमेन-लिंगी येथून लढवली. परंतु दोन्ही ठिकाणी त्याला पराभवाचा सामना करावा लागला. गंगटोकमधून 2019 च्या पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. आता विधासभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

बायचुंग भुतिया हा भारताचा सर्वाधिक यशस्वी फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. त्याने भारताकडून खेळताना सर्वाधिक गोल केले आहेत. तसेच भुतियाने युरोमधील मोठ्या क्लबकडून फुटबॉल खेळला आहे. फुटबॉलमध्ये यशस्वी झालेल्या बायचुंग भुतियाला राजकारणात मात्र यश मिळालं नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा

व्हिडीओ

Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
Embed widget