Bhagwangad : मोठी बातमी : भगवान गडाच्या चौथ्या मठाधिपतींची घोषणा, नामदेव शास्त्रींनी उत्तराधिकारी जाहीर केला
Bhagwangad : महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषण केली आहे.
Bhagwangad, अहमदनगर : भगवान गडाचे चौथे मठाधिपती म्हणून महंत नामदेव शास्त्री यांनी महंत कृष्णा महाराज शास्त्री यांची घोषणा केली आहे. नामदेव शास्त्री यांनी महंत कृष्णा महाराज यांना आपले उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानगड आहे. याच गडाचे मठाधिपती म्हणून महंत कृष्णा महाराज हे चौथे मठाधिपती राहणार आहेत.
महंत कृष्णा महाराज नामेदव शास्त्री यांचे उत्तराधिकारी
महंत नामदेव शास्त्री यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुंडेंच्या दसरा मेळाव्यानिमित्त भगवानगड हा अधिक चर्चेत आला होता. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्यासह भगवानगड हा चांगलाच चर्चेत आला होता. मोठ्या संख्येने राज्यातील भाविक दर्शनासाठी याच गडावर येत असतात. मुंडे आणि भगवानगड हे समीकरण नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे.
वारकरी संप्रदाय भगवान गडाला आपले पवित्र स्थान मानतो. 60 दशकात नावारुपास आलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या किर्तनकारांच्या नावावरुन भगवानगड हे नाव पडलं. अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर हा भगवान गड आहे. भगवानगडान मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यातील लोक दर्शनासाठी येत असतात.
मलाच राजकीय भाषण नको होतं, नामदेव शास्त्री मुंडेंच्या मेळाव्याबाबत काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा भक्ती गडावर पार पडला होता. त्यापूर्वी नामदेव शास्त्री यांनी महत्तपूर्ण प्रतिक्रिया दिली होती. "गडाच्या दसऱ्या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरु केलेली नाही. गेल्या 10 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर भगवान गडावर होणारा दसरा मेळावा हा मी बंद केला. त्यांच्या वादामुळे भगवान गडावरचा मेळावा बंद झालेला नाही. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला".
इतर महत्त्वाच्या बातम्या