Lok Sabha Election 2024 : समोर पराभव दिसत असल्याने असे खोटे आरोप; रोहित पवारांच्या दाव्याला मंत्री शंभुराज देसाईंचे, म्हणले...
बारामतीत विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर आता राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत रोहित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
Baramati Lok Sabha Election पुणे : बारामतीत (Baramati Lok Sabha Election) विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक्सवर व्हिडिओ शेअर करत पैसे वाटप झाल्याचा आरोप केला होता.
यावर आता राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांनी प्रत्युत्तर देत रोहित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पराभव समोर दिसायला लागला की अशा पद्धतीने आरोप केले जातात. ही नेहमीची काही लोकांची सवय आहे. कुठले तरी व्हिडिओ टाकून तिथे पैशांचा वापर होत असल्याचा दावा करायचा, ज्यांना पराभवसमोर दिसतो त्याच वेळी हे असे प्रकार होतात. मी बारामती लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली. तिथं परिस्थिती एकदम सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांनी बोलताना दिलीय.
समोर पराभव दिसत असल्याने असे खोटे आरोप
भोर तालुक्यातील एका गावात रात्री पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. पैसे वाटणारे लोक अजित दादा मित्रमंडळाचे कार्यकर्ते असल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. या आरोपानंतर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या वाहनातून पैसे वाटल्याचा आरोप केला जात होता, त्या वाहनाच्या काचा देखील फोडण्यात आल्या. त्यावरुन आता राज्याचे राजकारण तापल्याचे बघायला मिळत आहे. अशातच राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी हे सर्व आरोप खोट असल्याचे म्हटलंय.
पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. महायुतीत अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा बनवला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांना निकालानंतर नेमकं काय आहे ते कळेल. माझा संजय राऊत यांना सवाल आहे की साधी जिल्हा परिषद निवडणूक तरी तुम्ही लढले आहात का? आमच्याच मतांवर तुम्ही चार वेळा खासदार झाला आहात. त्यांना त्यांना येत्या काही काळात कळेल कि सुनेत्रा पवार किती चांगल्या मताधिक्याने निवडून येतात. असे शंभूराज देसाई म्हणाले.
उद्धव ठाकरेंनीच पाठीत खंजीर खुपसला
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला. संजय राऊत यांनी पक्षाच्या उलट भूमिका उद्धव ठाकरे यांना घ्यायला लावली. त्यामुळे आज जे पक्षाची परिस्थिती झाली आहे, याला केवळ संजय राऊत जबाबदार आहेत. असेही शंभूराज देसाई म्हणाले.
राजन विचारे म्हणजे दुसरे संजय राऊत- शंभूराज देसाई
राजन विचारे म्हणजे दुसरे संजय राऊत आहेत. संजय राऊत यांचे राजन विचारेंना संगत लागली आणि ते देखील असं बोलायला लागले आहेत. ते आधी असे नव्हते ते आज झाले आहेत. विचारेंकडे माहिती होती तर ते दोन वर्षे गप्प का बसले? निवडणुका आल्यावर शेवटच्या दोन-चार दिवसात तुम्हाला का बोलावं लागत आहे. हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट आहे. पराभव समोर दिसू लागल्याने ते आता लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी राजन विचारे केविलवणा प्रयत्न करत असल्याची टीका शंभूराज देसाई यांनी राजन विचारेंवर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या