Balasaheb Thackeray Portrait Painting : बाळासाहेब ठाकरेंचं 27 हजार चकाकणाऱ्या हिऱ्यांनी सजवलेलं सुंदर पोर्ट्रेट, ख्यातनाम कलाकाराचे सहा महिन्यांचे परिश्रम पाहून उद्धव ठाकरे म्हणाले...
Balasaheb Thackeray Portrait Painting : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27 हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
Balasaheb Thackeray Portrait Painting : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27 हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे. शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत. शैलेशने हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल, अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
7 हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला
27 हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते. उद्धव ठाकरेंना पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया अरे वा सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत , माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर , हिंगोली - नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.
View this post on Instagram
माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जालना मधील बदनापूर विधानसभा मतदार संघातील आरएसएस पदाधिकारी, भाजप नेते डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा.डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, सुप्रसिद्ध वकील विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर… pic.twitter.com/o57NThjUYc
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 26, 2024
इतर महत्वाच्या बातम्या