Bala Nandgaonkar: बाळासाहेब आपले हृदय, उद्धव अन् राज ठाकरे...; बाळा नांदगांवकरांनी लालबाग गाजवलं, ठाकरेंकडूनही जोरदार टाळ्या, VIDEO
Bala Nandgaonkar On Raj Thackeray And Uddhav Thackeray Lalbaug: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवडी येथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Bala Nandgaonkar On Raj Thackeray And Uddhav Thackeray Lalbaug: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर काल शिवडी येथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे नेते बाळा नांदगांवकरही उपस्थित होते. यावेळी बाळा नांदगांवकरांनी (Bala Nandgaonkar) आपल्या भाषणाने लालबाग गाजवलं. ठाकरे गटातून तिकीट न मिळाल्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या अनिल कोकीळ यांच्यावर बाळा नांदगांवकरांनी निशाणा साधला.
शिवडी तुमही आहे अन् तुमचीच राहणार- बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar Uddhav Thackeray)
बाळासाहेब ठाकरे आपले हृदय आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बाळासाहेबांचे डोळे आहेत आणि डोळ्यांच्यासमोर बसलेले तुमचा तिसरा नेत्र आहे, असं बाळा नांदगांवकर म्हणाले. त्यामुळे कितीही डोम कावळे आणि कितीही कोकीळ्या कुहू कुहू करायला लागल्या, तरीही शिवडी तुमची आहे आणि तुमचीच राहणार, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, असं बाळा नांदगांवकरांनी सांगितले.
घसा खराब झाल्याने उद्धव ठाकरेंचं मौन- (Uddhav Thackeray BMC Election 2026)
महापालिका निवडणुकीचं घोडामैदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलं आहे. 15 जानेवारीला मुंबईसह राज्यात 29 महापालिकांची निवडणूक पार पडणार आहे. तर दुसरीकडे प्रचारसभांना जोर आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शाखाभेटी सुरु आहेत. मात्र एकाही शाखा भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाषण केलेलं नाही. कारण प्रचाराच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरेंचा घसा खराब झाला आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरेंना त्यामुळे मौन बाळगावं लागलं. लालबाग या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहचले. उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. या ठिकाणी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंचा घसा खराब झाल्याची आणि त्यांना अजिबात बोलता येत नसल्याची माहिती दिली.
उद्धव ठाकरेंकडून शिवडीतील सर्व उमेदवारांना शुभेच्छा- (Uddhav Thackeray In Lalbaug)
शिवडी विधानसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवशक्तीचे उमेदवार श्रध्दा जाधव, भारती पेडणेकर, किरण तावडे, सुप्रिया दळवी आणि सचिन पडवळ यांच्या प्रचार कार्यालयात उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
























