एक्स्प्लोर

Bala Nandgaonkar: कल्याण-डोंबिवलीत जे घडलं तेच मुंबईत होणार? बाळा नांदगावकरांचं सूचक विधान; म्हणाले, राजकारणात...

Bala Nandgaonkar: कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Bala Nandgaonkar: महापालिका निवडणुकांसाठी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते. तर, ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गट-मनसेच्या या युतीवरुन जोरदार चर्चा रंगली आहे. तर कल्याण डोंबिवलीत जे घडलं तेच मुंबईत देखील घडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सूचक विधान केलंय. केडीएमसीमध्ये जे घडलं ते मुंबईत होणार नाही, यावर भाष्य करणे आता योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत, असे देखील बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. 

Bala Nandgaonkar: राजकारणात काहीही होऊ शकते

केडीएमसीमध्ये जे घडले तेच मुंबईत होणार का? असे बाळा नांदगावकर यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यावर आता भाष्य करणे उचित नाही. कारण राजकारणात काहीही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली. कोकणात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली. स्थानिक पातळीवर आम्ही नेत्यांना अधिकार दिले होते, त्यानुसार त्यांनी निर्णय केलेला आहे. कुठे कोणते निर्णय घ्यायचे, यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, त्यावर पक्ष कारवाई करू शकतो. त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. 

Uddhav Thackeray: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज 

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना धीर देत, विरोधी पक्षात बसलो तरी सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. नगरसेवकांनी दोन्ही पक्षांकडून संपर्क व प्रस्ताव येत असल्याचे सांगत मार्गदर्शन मागितले असता, कोणताही निर्णय पक्षपातळीवरच घेतला जाईल, सध्या तरी महापालिकेत विरोधी बाकावरच बसण्याचा निर्णय असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, मनसे व आमचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत एक ताकदीचा विरोधी गट उभा राहिला असता. हा निर्णय घ्यायला नको होता, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आणखी वाचा 

BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Amit Thackeray: 'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
'तामिळनाडूकडून धडा घ्या, महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर'; 'नीट' रद्दच्या ठरावावरून अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget