एक्स्प्लोर

Bajrang Sonawane : मनोज जरांगे फॅक्टरमुळे माझा विजय, बीडच्या मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरिबाला निवडून दिलं : बजरंग सोनवणे

Bajrang Sonawane, Beed Loksabha : बीड लोकसभा (Beed Loksabha) निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी बीड जिल्ह्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत.

Bajrang Sonawane, Beed Loksabha : बीड लोकसभा (Beed Loksabha) निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी बीड जिल्ह्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत. शिवाय मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या फॅक्टरचा विजय आहे. बीडच्या मायबाप जनतेने धनदांडग्याला लोकांना नाही तर गरिबाच्या मुलाला निवडून दिलं आहे, असंही बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले. बीडमध्ये विजय मिळवल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

बीडमध्ये सोनवणे वि. मुंडे अटीतटीची लढत 

बीड लोकसभा मतादरसंघातील लढत ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जात होती. कारण या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील शरद पवारांनी ताकद लावली होती. त्यामुळं ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे. पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. आज सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळे अतिशय संवेदनशील बनला होता. प्रत्येक फेरीत आघाडी घेणारा उमेदवार बदलत होता. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वांत अटीतटीची लढत बीड लोकसभेत पाहायला मिळाली. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला 

बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणूकीत सर्वांत मोठा परिणाम झाल्याचे बोलले गेले. ओबीसी विरुद्ध मराठा वादाने या मतदारसंघात जोर धरला होता. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती. बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : बीड आणि वायव्य मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा, मतमोजणीचं कन्फ्युजन संपेना, वाचा प्रत्येक क्षणाची अपडेट

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget