एक्स्प्लोर

Badlapur Nagarparishad Election: भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला, श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्त्वाचा पराभव, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका जिंकल्या

Badlapur Nagarparishad Election: बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका ठरला आहे. रवींद्र चव्हाणांची रणनीती यशस्वी.

Badlapur & Ambernath Nagarparishad Election Result 2025: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पुढील पाच ते सहा तासांमध्ये या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजप (BJP) पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 288 नगराध्यक्षांपैकी 120 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर शिंदे गटाला 54, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 40, काँग्रेस 34, शरद पवार गट 7, ठाकरे गटाचे 8 नगराध्यक्ष निवडून आले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपच्या तोडीस तोड केलेली कामगिरी ही या निकालाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मात्र, त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये (Badlapur Nagarparishad) भाजपने घवघवीत यश मिळवत येथील सत्ता हस्तगत केली.

बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेनेचा पराभव हा एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे राज्यभरात फिरुन प्रचार केला होता. त्यामुळे ठाण्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांच्या निवडणुकीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. या दोन्ही नगरपरिषदा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे याठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु, या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्णपणे निष्प्रभ ठरली. 

गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता या नगरपरिषदेत होती. अंबरनाथ हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. मात्र, याच बालेकिल्ल्यात भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी सुरुंग लावला आहे. जो गोळीबार झाला त्यामुळे मतदान फिरले, आता नगराध्यक्ष झाल्यावर पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवणार असे तेजश्री यांनी सांगितले आहे.

Ambernath news: अंबरनाथ नगरपरिषदेच्या निकालाचे विश्लेषण 

१) मतदानाच्या अवघ्या 48 तास आधी अंबरनाथमध्ये झालेल्या गोळीबाराचा थेट परिणाम नगराध्यक्षपदाच्या मतांवर झाला.
२) अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबीयांची असलेली दहशत हा मुद्दा उपस्थित करत विरोधक भाजपने निवडणूक प्रचार केला.
३) भाजप–शिवसेना युतीतील वादामुळे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजप हा पर्याय मतदारांना उपलब्ध झाला.
४) शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर तसेच त्यांचे पुत्र निखिल वाळेकर यांचा अति आत्मविश्वास शिवसेनेसाठी अडचणीचा ठरला.
५) अंबरनाथमधील व्यापारी संघाने शेवटच्या टप्प्यात भाजपला पाठिंबा दिला.
६) शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी वाळेकर कुटुंबाबाहेरील अन्य उमेदवार दिला असता, अंबरनाथमधील नगराध्यक्षपदाचा गड राखता आला असता.
७) प्रचारासाठी मिळालेला वाढीव वेळ शिवसेनेने चांगल्या प्रकारे वापरला; मात्र त्याचा फायदा मुख्यतः नगरसेवक पदापुरताच मर्यादित राहिला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अति आत्मविश्वास अडथळा ठरला.
८) प्रचारासाठी मिळालेल्या वाढीव वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी अंबरनाथमध्ये सभा घेतल्याने भाजपला नगराध्यक्षपदासाठी थेट फायदा झाला.
९) शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार जोमाने प्रचार करत होते; मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर व वाळेकर कुटुंबीय प्रचारापेक्षा आत्मविश्वासावर अधिक अवलंबून राहिले.
१०) अंबरनाथमध्ये ‘वाळेकर’ हे नाव रक्तरंजित गुंडगिरीशी जोडलेले असल्याची प्रतिमा

Ambernath Nagarparishad Result 2025: अंबरनाथ नगरपरिषद

एकूण नगरसेवक 59

आतापर्यंत विजयी उमेदवार

भाजप 14 विजयी 

- स्वप्ना गायकवाड
- मीना वाळेकर
- ⁠भाजप उमेदवार विजयी
- ⁠रंजना कोतेकर
- ⁠मनीष गुंजाळ
- ⁠अभिजीत करंजुले
- ⁠जयश्री थर्टी
- ⁠अनिता भोईर
- ⁠सुजाता भोईर
- ⁠सचिन गुंजाळ
- ⁠सुप्रिया आतिष पाटील
* मिनू सिंग
* पवन वाळेकर
* पूनम पाटील

शिवसेना 22 विजयी 

- विजयी शिंदे
- ⁠रेश्मा गुडेकर
- ⁠राहुल सोमेश्वर
- ⁠निखिल चौधरी
- ⁠ज्योत्सना भोईर
- ⁠कुणाल भोईर 
- ⁠अपर्णा भोईर
- पल्लवी लकडे
- विकास सोमेश्वर
- स्वप्निल बागुल
- पुरुषोत्तम उगले
- संदीप भराडे
- कल्पना गोरे
- रोहिणी भोईर 
- संदीप तेलंगे 
- अजय मोहिरीकर
- सचिन मंचेकर
- रेश्मा सुर्वे
- सुनिता बागुल
- रवींद्र करंजुले
- दीपक गायकवाड
- रवी पाटील

अजित पवार गट 4 विजयी 

सदाशिव पाटील
मीरा शेलार
सचिन पाटील
सुनिता पाटील

काँग्रेस 12

दर्शना पाटील
अर्चना पाटील
हर्षदा पाटील
तेजस्विनी पाटील
प्रदीप पाटील
विपुल पाटील
कबीर गायकवाड
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी देवडे
दिनेश गायकवाड
किरण राठोड

अंबरनाथ नगरपरिषद 2015 पक्षीय बलाबल

शिवसेना - २५ 
भाजपा - १० 
राष्ट्रवादी- ५ 
कॅांग्रेस - ८ 
अपक्ष - ७

Badlapur Nagarparishad Election: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल

गेल्या 25 वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता या नगरपरिषदेत होती. बदलापूर हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची पत्नी वीणा म्हात्रे यांचा पराभव करत रुचिता घोरपडे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होणे, हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Badlapur Nagarparishad Election Result: बदलापूर नगरपरिषद निवडणूक निकाल

नगरपालिका – नाव कुळगांव बदलापूर नगर परिषद 
एकूण जागा – ४९+१=५०
नगराध्यक्ष –  रुचिता घोरपडे भाजप 

भाजप २३ जागांवर विजय 
शिवसेना २३ जागांवर विजय 
राष्ट्रवादी ०३ जागांवर विजयी 

आणखी वाचा

महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून, आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
तासगावमध्ये आर.आर. आबांच्या लेकास दे धक्का;रोहित पाटलांचा पराभव, संजय काकांना अखेर गुलाल
Embed widget