Bacchu Kadu : नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची घोषणा; प्रहार ठाम, महायुतीला घाम!
आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे.
अमरावती : सत्ताधारी महायुतीने अमरावती (Amravati) मतदाहरसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली आहे. राणा या भाजपच्या (BJP) कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, राणा यांना तिकीट मिळाले असले तरी त्यांची डोकेदुखी अद्याप कमी झालेली नाही. त्यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) नाराज आहेत. तसेच महायुतीचा भाग असलेल्या प्रहार (Prahar) या पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीदेखील राणा यांना विरोध केला आहे. आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे. ते आज (28 मार्च) 'एबीपी माझा'शी बोलत होते.
बच्चू कडू काय म्हणाले?
उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आमची स्वत:ची पानटपरी (स्वत:चा पक्ष) आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले.