एक्स्प्लोर

Bacchu Kadu And Nilesh Lanke : अमरावतीनंतर आता नगरमध्येही महायुतीला धक्का, बच्चू कडू निलेश लंकेंना बळ पुरवणार? सूचक विधानामुळे चर्चेला उधाण 

बच्चू कडू यांनी अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

अहमदनगर : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti) अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू महायुतीचे (Mahayuti) भाग आहेत. मात्र तरीदेखील त्यांनी महायुतीच्याच उमेदवार राण यांना थेट विरोध केल आहे. ब्रह्मदेव आला तरी आम्ही तेथून माघार घेणार नाही, असं कडू म्हणालेत. दरम्यान, अमरावतीनंतर आता बच्चू कडू अहमदनगरच्या रुपात महायुतीला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. ते अहमदनगरचे महाविकास आघडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता आहे. 30 मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना तसं सूचक विधान कडू यांनी केलं आहे. 

काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत

बच्चू कडू प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बैठका घेत आहेत. बैठकांच्या माध्यमातून ते स्थानिक परिस्थिती समजून घेत आहेत. त्यांनी 30 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अहमदनगर या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं. प्रत्येक जिल्ह्यातील काही कार्यकर्ते असं सांगत आहे की आम्हाला भरपूर त्रास झाला आहे. काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत. त्यामुळे हा सगळा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावं लागणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

कडू यांचे कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करणार का?

बच्चू कडू यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तसं पाहायचं झाल्यास अहमदनगरमध्ये कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची फारशी ताकद नाहीत. मात्र स्थानिक राजकारणात या पक्षाचे नेते विखे घराण्याला विरोध करतात. त्यामुळेच कदाचित लंके चांगले आहेत, असं मला कार्यकर्ते सांगतायत , असं कडू म्हणाले आहेत. त्यामुळे अहमदनगरमध्ये कडू यांचे कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

...तर अहमदनगरमध्येही महायुतीला धक्का 

दरम्यान, बच्चू कडू यांनी लंके यांना पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र त्यांनी लंके यांना पाठिंबा दिल्यास हा एकाप्रकारे महायुतीला धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. कारण अमरावतीमध्ये कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना थेट विरोध केला आहे. मी एकवेळ महायुतीतून बाहेर पडेन पण माघार घेणार नाही, असं कडू म्हणाले आहेत. त्यानंतर कडू यांनी अहमदनगरमध्येही लंके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास हे सरळ-सरळ महायुतीविरोधात काम करत आहेत, असा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे कडू महायुतीची साथ सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नवनीत राणांची डोकेदुखी वाढणार

दरम्यान, या प्रश्नांची उत्तरं काही दिवसांत स्पष्ट होतीलच. पण कडू यांच्या भूमिकेमुळे नवनीत राणा यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तर अहमदनगरमध्ये कडू यांनी लंके यांना पाठिंबा दिल्यास तेथील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDevendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget