(Source: Matrize)
रायगडमध्ये राडा! ठाकरे गटाच्या रायगड जिल्हाप्रमुखावर रात्री हल्ला; भरत गोगावलेंवर टीका केल्यानं हल्ला, ठाकरे गटाचा आरोप
Raigad News: अनिल नवगणे रात्री आपल्या घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींकडून मुंबई गोवा हायवेवर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
रायगड : रायगडमध्ये (Raigad) ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर (Anil Navgane) रात्री 10.30 च्या सुमारास हल्ला झालाय . त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. दरम्यान शिंदे गटाकडून हा हल्ला करण्यात आलाचा आरोप करण्यात आलाय. इंदापूरला जात असताना लोणेर वीर दरम्यान हा हल्ला झाला.. यानंतर या ठिकाणाहून अज्ञात व्यक्तींनी पळ काढला.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.
महाडमध्ये गुरुवारी इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्येअनिल नवगणे भरत गोगावले, त्यांचे पुत्र विकास गोगावले तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र सभेनंतर अनिल नवगणे रात्री आपल्या घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींकडून मुंबई गोवा हायवेवर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला केलेल्या व्यक्ती नवगणे घरी परतणाऱ्या मार्गावर लपून बसले होते. नवगणे यांची गाडी येताच लपून बसलेल्या व्यक्तींनी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला.
अनिल नवगणे यांच्या कारच्या काचा फोडल्या
या हल्ल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा झाला. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनाास्थळी पोहचले. अनिल नवगणे यांनी हल्ल्यानंतर पोलीसात तक्रार केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.सुदैवाने अनिल नवगणे यांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र नवगणे प्रवास करत असणाऱ्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारच्या काचा फोडण्यात आल्या आहे.
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट
नवगणे यांच्या हल्ल्यानंतर रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ही स्थिती संयमानी हाताळली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा हल्ला झाल्याने तणाव निर्माण झाला. माात्र हा हल्ला का केला? यामागे काही राजकीय हेतू होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांच्यात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर येत असतात. हा हल्ला त्याच तणावातून झाला का याचा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :