एक्स्प्लोर

Congress President Election: अशोक गेहलोत यांनी बोलावली विधिमंडळ दलाची बैठक, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार?

Congress President Election: काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सक्रिय झाले आहेत.

Congress President Election: काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे सक्रिय झाले आहेत. एकीकडे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor)  हे देखील पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत असताना अशोक गेहलोत यांनी आज रात्री 10 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत हे उमेदवार असू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत 26 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांबाबत काही मोठी माहिती समोर येऊ शकते. आज उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या स्वागतात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागत मेजवानीनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात हालचालींना वेग आलेला असताना अशोक गेहलोत हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. गेहलोत उद्या दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याच दरम्यान अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाची चर्चा आधीच फेटाळून लावली आहे. यातच राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. त्यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र ते निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारत जोडो यात्रेला मध्येच सोडून राहुल गांधी दिल्लीला परतणार नसल्यामुळे ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या ही यात्रा केरळ सुरु असून 29 सप्टेंबरला ती कर्नाटकात दाखल होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. नामनिर्देशनासाठी उमेदवाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे देखील आवश्यक आहे.

शशी थरूर हेही शर्यतीत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हेही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करू शकतात. अगदी शेवटच्या दिवशी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही अर्ज भरणार असल्याची भरल्याची चर्चा आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता आणखी एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की, अशोक गेहलोत पक्षाचे अध्यक्ष झाले तर राजस्थानमध्ये नवे  मुख्यमंत्री कोण असेल.

इतर महत्वाच्या बातम्या: 

CBI Raids : CBI च्या जाळ्यात नेतेमंडळी ; युपीए काळात 65 टक्के, तर एनडीएच्या काळात 95 टक्के विरोधकांवर कारवाई
CM Bhagwant Mann : दारुच्या नशेत असल्यानं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवलं, सुखबीर सिंग बादल यांचा आरोप, आप ने आरोप फेटाळले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget