Ashok Chavan : तुरुंगात जायचं नाही असं सांगत सोनिया गांधींसमोर खरोखरच रडले का? राहुल गांधींच्या टीकेला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
Ashok Chavan Reply To Rahul Gandhi : मी या शक्तीसमोर लढू शकत नाही, मी तुरुंगात जाणार नाही असं महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने सोनिया गांधींना सांगितल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते.

मुंबई: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं सांगत आपण काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधीला (Sonia Gandhi) भेटलो नाही असं भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्पष्ट केलं. आपण काँग्रेस सोडणार आहे कुणालाही माहित नव्हतं , शेवटपर्यंत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काम करत होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता काँग्रेस सोडण्यापूर्वी सोनिया गांधी यांना भेटला आणि जेलमध्ये जाणार नसल्याचं सांगत तो रडला असं नाव न घेता राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाला. शिवतीर्थावरील भाषणात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली, ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. मी या शक्तीसमोर लढू शकत नाही, मला तुरुंगात जायचं नाही असं त्या नेत्यांने सांगितल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
त्यावर प्रतिक्रिया देताना तर राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद असून मी सोनिया गांधींना भेटलो नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. ते म्हणाले की, राज्यातील एक वरिष्ठ नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला. तो माझ्या आईला रडून सांगत होता की, सोनियाजी मला लाज वाटते. माझ्यात या शक्तीच्या विरोदात लढण्याची हिंमत नाही. मी तुरुंगात जाऊ शकत नाही. दबावामुळे भाजपमध्ये गेलेले ते एकटेच नेते नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेते असेच भाजपमध्ये गेले नाहीत. मी ज्या शक्तीचा उल्लेख करत आहे त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे हे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत.
ही बातमी वाचा:
VIDEO Ashok Chavan : Rahul Gandhi यांचं वक्तव्य हास्यास्पद , मी सोनियांना भेटलो नाही : अशोक चव्हाण
























