Rahul Gandhi in INDIA alliance rally in Mumbai : माझ्या आईला फोन करून रडत सांगत होते लढण्याची ताकद नाही, जेलमध्ये जायचं नाही; राहुल गांधींचा अशोक चव्हाणांवर नाव न घेता हल्लाबोल!
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल यांनी हाच धागा पकडत मुंबईमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीत अशोक चव्हाण यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
मुंबई : काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही. ते याच राज्यातील आहेत. त्यांनी माझ्या आईला (सोनिया गांधी) फोन करून रडत सांगत होते, सोनियाजी मला लाज वाटते, माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाही अशा शब्दात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल यांनी हाच धागा पकडत मुंबईमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीत अशोक चव्हाण यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
आम्ही एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत
राहुल गांधी म्हणाले की, अनेकांनी सांगितलं सोशल मीडिया हा एक मार्ग आहे, मात्र सोशल मीडिया मार्ग नाही. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव आहे. लोक विचार करतात की आम्ही सर्व विरोधक एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहोत. मात्र हे खरं नाही. देशातील तरुणांना हे समजून घेण्याची गरज आहे की, आम्ही एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीचा चेहरा समोर करण्यात आला आहे. आम्ही एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. कुणीतरी तर इथे म्हटलं की राजाचा जीव ईव्हीएम मशीनमध्ये आहे. हे खरं आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, देशातील प्रत्येक संस्थेत आहे, ईडीमध्ये आहे, सीबीआय मध्ये आहे, आयकर विभागात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं असेच गेले नाही
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते (अशोक चव्हाण) काँग्रेस पक्षाला सोडून गेले. आणि माझ्या आईला रडून सांगतात, सोनियाजी मला लाज वाटते, माझ्यात या शक्ती विरोधात लढण्याची हिंमत नाही. मी जेलमध्ये जाऊ शकत नाही. असे ते एकटेच नेते नाही असे हजारो लोक आहेत. ज्यांना घाबरवण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं असेच गेले नाही. ज्या शक्तीचा मी उल्लेख करत आहे त्यांनी या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपसोबत घेतलं आहे. त्यामुळे हे सगळे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी, भाई और बहनों हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचची छाती नसून खोकला आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. मी विचार केला, मात्र एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करण्याचा ठरवलं. तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झालं पाहिजे. धारावीत टॉयलेट आहे, आज या धारावीमधील लोकांना ती शक्ती त्यांच्या घरातून बाहेर काढून फेकत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या