Ashok Chavan : नरेंद्र मोदी जगात एक नंबरवर, देशाला चांगलं नेतृत्व मिळालं, त्यांना हॅट्स ऑफ करतो; अशोक चव्हाण यांच्याकडून पंतप्रधानांची पुन्हा स्तुती
Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देशाच्या नेतृत्वावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची पुन्हा एकदा स्तुती केली आहे.

Nanded : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देशाच्या नेतृत्वावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची पुन्हा एकदा स्तुती केली आहे. देशात नरेंद्र मोदी उत्तम काम करत आहेत. महिला पासून, युवकापासून, गरिबापर्यंचे चांगले काम करण्याची भूमिका पंतप्रधान मोदी यांची आहे. मी मोदी साहेबांना हॅट्स ऑफ करतो, देशाला चांगलं नेतृत्व मिळालंय, असं वक्तव्य माजी काँग्रेस नेते व विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. आज नरेंद्र मोदी जगात एक नंबर वर आहे. रविवारी भाजप तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
राजकारणातला स्थर घसरलाय, तो ठीक करायचा असेल तर....
राज्यातील राजकारणातला स्थर घसरत चला आहे. राजकारणाचा स्तर घसरला आहे तो ठीक करायचा असेल तर एमपीएससी, यूपीएससी मधील विद्यार्थ्यांनी राजकारणात येण्याचा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला. स्पर्धा परीक्षेतील अधिकारी राजकारणात आले पाहिजे असेही ते म्हणाले.
सेवाग्राममध्ये भाजपची विदर्भस्तरीय बैठक, एकेकाळच्या काँग्रेसच्या जिल्ह्यात भाजपचं मंथन
वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची विभागीय मंथन बैठक सेवाग्रामच्या चरखागृह येथे आज( 28 जुलै) आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून निवडणुकांबाबत रणनीती ठरविली जाणार आहे. मात्र एकेकाळच्या काँग्रेसच्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहे. सेवाग्राम मध्ये होत असलेल्या भाजपच्या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे वर्ध्यात कडवट डाव्या विचारसरणीच्या काही संघटना सक्रिय आहेत, म्हणून उजव्या विचारसरणीच्या भाजपने वर्ध्यात बैठक घेऊ नये असं, निष्कर्ष काढता येत नाही, असे मत गृहराज्यमंत्री व वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील भाजप आमदारांनी वर्ध्यात कडवट डाव्या विचारसरणीच्या संघटना सक्रिय असल्याचं आरोप केलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत भाजपच्या विदर्भातील सुमारे 700 पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होत आहे.
कडवट डाव्या विचारसरणीच्या नरेटीव्हला पराभूत करण्यासाठीच उजव्या विचारसरणीच्या भाजपची बैठक वर्ध्यात होत आहे का असा प्रश्न एबीपी माझा ने पंकज भोयर यांना विचारला होता. वर्ध्यात काही कडवट डावे कार्यकर्ते सक्रिय असून त्यावर सरकारचा लक्ष आहे. मात्र, कडवट डावी विचारसरणी सक्रिय आहे, म्हणून उजव्या विचारसरणीच्या भाजपने त्या ठिकाणी बैठक घेऊ नये असं त्याचा अर्थ होत नाही असे भोयर म्हणाले. भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून आज मुख्यमंत्री विदर्भातील तयारीचा आढावा घेतील आणि भविष्यात राज्यातील इतर विभागातही अशाच बैठका घेऊन आढावा घेतला जाईल अशी माहिती ही भोयर यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
























