Ashok Chavan and Satyajeet Tambe : अशोक चव्हाण म्हणाले, काय सत्यजीत आवाज देत नाहीस, तांबे म्हणाले, साहेब तुम्हीच आवाज बंद केला
विधानभवन परिसरात काँग्रेसमधील नाराजी चित्रानंतर वेगळा किस्सा पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याशी बातचीत केली.
नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागपुरात अनेक मुद्द्यावरुन सरकार आणि विरोधकांमध्ये मोठं घमासान होत आहेच. पण काही गमती जमतीही पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या आमदारकीवरुन ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) हे नेहमीच डिवचत असतात. आजही त्यांनी विधानभवन परिसरात गोगावलेंना मंत्रिपदावरुन डिवचल्याचं सर्वांनी पाहिलं. मात्र दुसरीकडे विधानभवन परिसरात काँग्रेसमधील नाराजी चित्रानंतर वेगळा किस्सा पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याशी बातचीत केली.
अशोक चव्हाण म्हणाले, काय सत्यजित आवाज देत नाहीस. त्यावर सत्यजित तांबेंनी, काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला, असं म्हणत उत्तर दिलं. नागपूरमध्ये विधानभवन परिसरात घडलेल्या या किस्स्याने, सर्वजण फ्लॅशबॅकमध्ये गेले. कारण पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये मोठं घमासान झालं होतं
पदवीधर निवडणूक
नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेली ही निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाददेखील चव्हाट्यावर आले. ज्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते.तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर सत्यजित यांचे मामा आणि काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार
सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधील घमासानानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शिवसेना उमेदवार शुभांगी पाटलांचा दारुण पराभव झाला होता.
हिवाळी अधिवेशन
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरात (Nagpur) सुरु झाली आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
VIDEO : सत्यजीत तांबे, अशोक चव्हाण भेट, नेमकं काय घडलं?
संबंधित बातम्या