राम भक्तांचा कार्यक्रम म्हटलं की शिवसेनेची बोटचेपी भूमिका होते: आशिष शेलार
Ashish Shelar On Shiv Sena: ''आमचा सरकारला थेट सवाल आहे. हिंदू सण म्हटलं की तुमच्या हाताला लकवा का मारतो. राम भक्तांचा कार्यक्रम म्हटल्यावर शिवसेनेची बोटचेपी भूमिका का होते'': आशिष शेलार
Ashish Shelar On Shiv Sena: ''आमचा सरकारला थेट सवाल आहे. हिंदू सण म्हटलं की तुमच्या हाताला लकवा का मारतो. राम भक्तांचा कार्यक्रम म्हटल्यावर शिवसेनेची बोटचेपी भूमिका का होते'', असा प्रश्न विचारत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. अशातच गुढीपाडवा आणि रामनवमी मिरवणुकांना परवानगी मिळावी म्हणून भाजप सातत्याने राज्य सरकारकडे मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
आशिष शेलार म्हणाले की, आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत, या दोन्ही सणांना संपूर्ण कायदेशी प्रक्रिया पूर्ण करून परवानगी देण्यात यावी. आम्ही सर्व मंडळांबरोबर, संस्थांबरोबर आणि मिरवणुकीच्या सर्व समित्यांबरोबर संपर्कात आहोत. भारतीय जनता पक्ष या उत्सवात संपूर्णपणे सहभागी होणार, असं ते म्हणाले आहेत.
शोभायात्रा जमावबंदीच्या कचाट्यात
दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील लोकांना गुडीपाडवा साजरा करण्यास आणि शोभायात्रा काढायला मिळणार आहे. यामुळे मुंबईकरांना नक्कीच आनंद आहे. मुंबईतील विलेपार्ले, गिरगाव सोबतच ठाणे आणि डोंबिवली या चार ठिकाणी प्रामुख्याने शोभायात्रा निघतात. असं असलं तरी विलेपार्ल्यात शोभायात्रा निघणार नाही. पार्लेश्वर मंदिरात गुढी उभारून सण साजरा करण्यात येणार आहे. मुंबईत जमाव बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना या मिरवणुकीत सहभाग घेता येणार नाही. अशातच राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या