(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashish Shelar : हिंदूंच्या सणाला परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो का? आशिष शेलारांची खोचक प्रतिक्रिया
Ashish Shelar : शिवसेना कार्यक्रम करतात तेव्हा ही कारणे येत नाही. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालणार
Ashish Shelar : ठाकरे सरकार (Thackeray Government) हिंदूंच्या सणाला परवानगी देताना हाताला लकवा भरतो का? हा प्रश्न आहे. गुढी पाडव्याच्या शोभा यात्रा, राम नवमी या बद्दल सरकारने भूमिका घेतली नाही. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. त्यांना ड्रॉनद्वारे हल्ला होण्याची भीती वाटत आहे, त्यांची तशी माहिती असेल. पण गुढी पाडवा आणि राम नवमी मिरवणुकाला परवानगी द्यावी. शिवसेना कार्यक्रम करतात तेव्हा ही कारणे येत नाही. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालणार, पण गुढीपाडवा नाही. हे आम्ही चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया देत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिलेत - शेलार
6 एप्रिल भाजपचा वर्धापन दिवस असतो. वर्धापन दिनानिमित्त एक व्यापक कार्यक्रम ठरवला आहे. भाजप हा जमिनीवर काम करणारा पक्ष आहे. देशात सर्वात जास्त सेवा करणारा पक्ष आहे. मुंबईत 6 एप्रिलला मुंबईतील शक्ती केंद्रात आम्ही सार्वजनिक कार्यक्रम करणार आहोत. सकाळी पंतप्रधान मोदी बोलणार आहेत. मुंबईत दिड हजार ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणार आहोत. सेवा सप्ताह असा कार्यक्रम आहे. मुंबईत आम्ही ताकदीने सेवा करायचे ठरवले आहे. मुंबईतील सर्व नाल्यावर भाजप नालेसफाई पाहणीला सुरुवात करणार आहे. सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिले आहेत आणि प्रशासन हातावर हात धरून बसेल आहेत. आम्ही दोघांनाही पळ काढू देणार आहोत. 6 ते 14 एप्रिल हा सप्ताह आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस आम्ही करणार आहोत
आदित्य ठाकरे, नाना पटोलेंवर टीका
भाजपा नेत्यांवर फर्जी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वतःच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे लपवण्याचं काम करू नये. ज्या यंत्रणा काम करत आहेत. त्यांना करू द्या. आदित्य ठाकरे म्हणजे मुंबई नव्हे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, भ्रष्टाचार मुक्तीला राज्यातील जनतेचे समर्थन आहे. तसेच खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले, ती गुडीया चावी दिली की बोलते, त्याला जण समर्थन आणि जन भावना कधी नसते, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Dilip Walse Patil : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार
- Aaditya Thackeray : यशवंत जाधव यांच्या डायरीतील 'मातोश्री' उल्लेखावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
- Aaditya Thackeray : नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले...