Ashish Shelar : अचानक उगवलेल्या राजकीय बांडगूळाला दिल्लीकरांनी फटकारले; मंत्री आशिष शेलारांची बोचरी टीका
Delhi Election Result 2025: अचानक उगवलेल्या राजकीय बांडगूळाला दिल्लीकरांनी फटकारले असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

Ashish Shelar on Delhi Election Result 2025 : सामान्य, कष्टकरी दिल्लीकरांचा 'मफलरने' गळा घोटणाऱ्या, फसवणाऱ्या आणि लुटेरे संधीसाधू राजनीतीची साफसफाई करुन दिल्लीकरांनी झाडूला सत्तेबाहेर फेकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी विचारधारे बाजूने राजधानीने दणदणीत कौल दिला. तसेच अचानक उगवलेल्या राजकीय बांडगूळाला दिल्लीकरांनी फटकारले असल्याची प्रतिक्रिया देत भाजप नेते आणि राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी अरविंद केजरीवालांवर (Arvind Kejriwal) बोचरी टीका केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Election Results 2025) अंतिम कौल आता हाती येऊ लागले आहे. अशातच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे. केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे. तर आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचाही पराभव झाला आहे. यावर बोलताना आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बोलकी प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसला मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तर मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवली आहे. ईव्हीएमला दोष देत आपले अपयश झाकण्याचा कार्यक्रम आता अजून जोरात करा, असा सल्ला देत आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आता मुंबईकरही 25 वर्ष भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक या सगळ्यांचे अभिनंदन करत महाराष्ट्र जिंकलाच आज राजधानी दिल्ली पण जिंकली असल्याचे ते म्हणालेय. तर आता आर्थिक राजधानीत ही मुंबईकर असाच बदल घडवणार आणि 25 वर्षे पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
अचानक उगवलेल्या राजकीय बांडगूळाला दिल्लीकरांनी फटकारले !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2025
सामान्य, कष्टकरी दिल्लीकरांचा "मफलरने" गळा घोटणाऱ्या... फसवणाऱ्या आणि लुटेरे... संधीसाधू राजनीतीची साफसफाई करुन दिल्लीकरांनी "झाडूला" सत्तेबाहेर फेकले आहे.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत…
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
