एक्स्प्लोर

Anna Hazare : दिल्लीत 'आप'चा गड ढासळला! अरविंद केजरीवालांच्या परभवावरुन अण्णा हजारेंचे चारित्र्यावर बोट, सगळंच सांगितलं

Anna Hazare On Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या पराभवावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिली प्रतिक्रिया देत थेट केजरीवालांच्या चारित्र्यावर बोट ठेवलं आहे.

Anna Hazare On Arvind Kejriwal Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Election Results 2025) अंतिम कौल आता हाती येऊ लागले आहे. अशातच सकाळपासूनच आम आदमी पक्ष (AAP) आणि भाजपमध्ये (BJP) मोठ्या चुरसीचा सामना रंगताना दिसत असताना आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या पराभवावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिली प्रतिक्रिया देत थेट केजरीवालांच्या चारित्र्यावर बोट ठेवलं आहे. (Anna Hazare On Arvind Kejriwal)

'जैसी करणी वैसी भरणी'- अण्णा हजारे

मी वेळोवेळी सांगत आलो आहे 'जैसी करणी वैसी भरणी', असा हा प्रकार आहे. अरविंद केजरीवाल हे सुरुवातीला जेव्हा माझ्या बरोबर होते त्यावेळी ते फार चांगले होते. मात्र जेव्हा डोक्यात सत्ता, पैसा आणि दारूचं दुकान शिरतं त्यावेळी प्रत्येकाचा ऱ्हास होत जातो. पहिल्यापासून ते जसे राहिले होते तसेच ते राहिले असते तर आज सत्तेत असते. मी कायम त्यांना सल्ला देत आलो आहे की, चरित्र जपलं पाहिजे. आधी ज्यावेळी ते मला भेटायचे त्यावेळेस असे वाटायचं की ते काहीतरी चांगलं करू शकतील. मात्र मधल्या काळात त्यांच्याकडे बघून हा विश्वास नाहीसा झाला. किंबहुना ते पुन्हा सत्तेत येतील की नाही हे आज सांगता येत नसल्याचे विधानही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलं आहे. 

..... त्या दिवसापासून मी बोलणं बंद केलं! - अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि पक्ष काढला त्यावेळेस पासून मी त्यांच्याशी बोलणे बंद केले. पक्ष काढल्यानंतर मी परत त्यांच्याशी कधीही बोललो नाही. त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकले. कारण माझ्यापुढे पक्ष विरहित समाजसेवा, देशहित हेचं प्रधान्य होतं आणि आम्हाला तेच हवं आहे. असेही अण्णा हजारे म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Atishi Marlena) विजयी झाल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget