Asaduddin Owaisi : तुमची शेवटची निवडणूक 2019 मध्येच झाली, असदुद्दीन ओवैसींचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल
Asaduddin Owaisi on Chandrakant Khaire, Chatrapati SambhajiNagar : शिवसेनेचा उमेदवार 30 वर्ष काय म्हणत होता? 21 वर्ष खासदार होता. म्हणायचा मी हिंदूत्वाचा नेता आहे.
Asaduddin Owaisi on Chandrakant Khaire, Chatrapati SambhajiNagar : "शिवसेनेचा उमेदवार 30 वर्ष काय म्हणत होता? 21 वर्ष खासदार होता. म्हणायचा मी हिंदूत्वाचा नेता आहे. तुमचं हे यश आहे की, तुम्ही त्याला मजबूर केले ईदगाहवर बोलावून. उद्धव ठाकरेंनी म्हणण्यास सांगितले की, मशीदीत जाऊन नमाज पडतात, त्यांचं ह्रदय चांगलं असतं. तर तुम्ही म्हणा की, आम्ही ह्रदय तर इम्तियाजला दिले आहे. खैरेंची शेवटची निवडणूक 2019 मध्ये झाली, आता त्यांची वापसी सुरू आहे", अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ठाकरे गटाचे उमेददवार चंद्रकांत खैरे यांच्यावर (Chandrakant Khaire) केली. औरंगाबादचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली यावेळी ते बोलत होते.
एकाही मुस्लीमाला उमेदवारी दिली नाही
ओवैसी म्हणाले, महाराष्ट्रात 48 जागांपैकी कोणत्याच पक्षाने एकाही मुस्लीमाला उमेदवारी दिली नाही. याबाबत औरंगाबादच्या लोकांनी विचार केला पाहिजे. मग हे कशाच्या आधारे म्हणत आहेत की, इम्तियाज जलीलचा पराभव करा. 30 वर्षांनंतर इम्तियाज जलील यशस्वी झाले, तर हे सगळे एकत्र झाले. सर्वांचे एकच लक्ष आहे की, इम्तियाज जलील यशस्वी होऊ नये. यांनी कोणत्याच मुस्लिम उमेदवार दिला नाही. मोदी वेगळ्या भाषेत बोलत आहे. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस इम्तियाज जलील निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहे. जलील निवडून येऊ नयेत म्हणून सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. खैरे मशिदीचे कौतुक करत आहे, त्यांनी सांगावं 6 डिसेंबरला त्यांनी पाप केलं होतं की नाही? बाबरी मस्जिद जिंदाबाद मी संसदेत म्हणालो होतो. नवीन नवीन सेक्युलर झालेले उद्धव ठाकरे आम्हाला उमेदवारी देत नाहीत. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होतील, तेव्हा ते सर्वांना विसरून जातील.
संसदेत मराठा आणि धनगर आरक्षणावर जलील बोलले
पुढे बोलताना ओवैसी म्हणाले, संसदेत मराठा आणि धनगर आरक्षणावर जलील बोलले. अकोल्यात आम्ही पाठिंबा दिला,वंचित समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान आहे, अल्पसंख्याक समाजाला घुसखोर म्हणत आहेत. आमचे आई-बहिणी जास्त मुलं जन्माला घालत आहे का? हिंदू बहिणीचं मंगळसूत्र काढून खिशात ठेवणं मोदी सांगत आहे. आम्ही मोदींच्या बापाला घाबरत नाही. देशातील एक करोड महिलांनी सोनं गहाण ठेवलं आहे. देशातील नागरिकांना शिव्या देणारा पंतप्रधान आहे. उद्या एनआरसी लागू झाल्यावर उद्धव ठाकरे येणार का? की काका पुतणे येणार आहे का? असा सवालही ओवैसी यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या