एक्स्प्लोर

Vijay Shivtare vs Anna Bansode: ...तर शिंदेंच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, दादांच्या आमदाराने शड्डू ठोकला

Baramati Lok Sabha Constituency: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर, आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

Anna Bansode on Vijay Shivtare : पुणे : इकडे लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आणि विरोधक, सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढल्या. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच बारामती मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चर्चेत होता, तो नणंद-भावजय अशा लढतीच्या चर्चांमुळे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात बारामतीची लढत रंगणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आणि अवघ्या राज्याच्या नजरा बारामतीवर (Baramati News) खिळल्या. मात्र, आता बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे (Sunetra Pawar vs Supriya Sule) यांच्या लढतीच्या चर्चा तशा काहीशा विरळ झाल्या आहेत. सध्या बारामतीत चर्चा आहे ती, विजय शिवतारेंनी अजित पवारांना दिलेल्या आव्हानाची.

विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात जणू एल्गारच पुकारलाय. शिंदे गटात असलेले माजी आमदार विजय शिवतारे बारामतीची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांची जवळपास जाहीरच केलं आहे. मात्र, आता शिवतारेंच्या बंडाचे परिणाम राज्यभर उमटणार आहेत. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांचा गट करणार नाही, अशी भूमिका आमदार अण्णा बनसोडेंनी घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीत बारामतीवरुन पेच तर निर्माण होणार नाही ना? अशा चर्चा सुरू आहेत. 

शिवतारेंच्या बंडाविरोधात अजित पवार गट आक्रमक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर, आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समजावलं आहे. मात्र तरीही त्यांनी बंडखोरी केली तर त्याचे परिणाम राज्यभर उमटतील. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.  

काय म्हणाले अण्णा बनसोडे? 

बारामती लोकसभेत शिंदे गटाचे विजय शिवतारे बंडखोरीवर ठाम आहेत. मात्र आता याचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज देऊन शिवतारे ऐकत नसतील तर आम्ही जिथं शिंदे गटाचे उमेदवार असतील तिथं प्रचार करणार नाही, अशी टोकाची भूमिका अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी घेतली. मावळ लोकसभेत खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार न करून, अजित पवारांचा गट पार्थच्या पवारांचा बदलाही घेऊ इच्छितो अशीच चर्चा आहे. या बाबत आमदार बनसोडे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. प्रचार करणार नाही याचा अर्थ विरोधकांचा प्रचार करुन असं नाही, आम्ही तटस्थ भूमिका घेऊ असं अण्णा बनसोडे म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ : Anna Bansode: Vijay Shivtare यांच्या बंडखोरीचे परिणाम राज्यभर उमटणार अण्णा बनसोडेंचे शिंदेंना आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
Embed widget