एक्स्प्लोर

Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर, चार दिवसांपासून धमक्या, 700-800 कॉल; अंजली दमानियांनी सगळंच सांगितलं

Anjali Damania on Dhananjay Munde & Pankaja Munde : वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय. माझा मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत, नरेंद्र सांगळे या व्यक्तीचा हा फोन करत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.  

अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, मी दोन विधानं केली होती. उच्चपदांवर वंजारी पदावर बीडमध्ये लोकं आहेत, असं बोलले होते.  गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं.  बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत.  समाज कष्टाळू, आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही.  समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले.  सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले  आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं.

धनंजय आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर

वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय, यात शंका नाही.शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती.  बिंदू नामावली निभावू, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं.  मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे.  मी पेपरशिवाय बोलत नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट दाखवले.   

चौथा दिवसांपासून धमक्यांचे कॉल

त्या पुढे म्हणाल्या की, अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली. नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकलाय, फोन उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करायला लागलेत. सुनिल फड यांनी देखील तसंच केले आहे. सुनील फड नावाच्या व्यक्तीकडून माझ्यावर अश्लील कमेंट केल्या आहेत. खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन बंद झालेले नाहीत. हे सगळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी बरखास्त करावी. नवीन एसटी स्थापन करा, त्यासाठी राज्याबाहेरून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. 

आणखी वाचा 

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाके संतापले, म्हणाले, 'तुमच्यात दम असेल तर...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्कPune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाIndia Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकलीAnjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Embed widget