तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली अशी बातमी आज माध्यमांपुढे आली.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनल कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. आयकर विभागाने अजित पवार (Ajit pawar) व त्यांच्या नातेवाईकांच्या बेनामी संपत्तीवर छापा टाकून ही संपत्ती जप्त केली होती. मात्र, न्यायालयाने आता ही संपत्ती रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच त्यांची आयकर विभागाकडील संपत्ती मोकळी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनीही प्रतिक्रिया देताना, तळपायाची आग मस्तकात गेल्याचं म्हटलं.
अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली अशी बातमी आज माध्यमांपुढे आली. खरच सांगते तळपायाची आग मस्तकाला गेली, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. तुम्ही आधी त्यांच्या मागे ईओडब्ल्यू लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्राला लावणार, इन्कम टॅक्सच्या रेड करणार आणि तुमच्यासोबत घेणार. अजित पवार यांना परत उपमुख्यमंत्रीपद मिळालं, जे ते सहा वेळा भूषवतात, सो कॉल हे त्यांना पद दिलं गेलं. 1000 कोटीची मालमत्ता परत दिली तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला आणि ह्यात जो सगळा फेर चाललाय ना की यंत्रणांचा वापर करायचा, केसेस टाकायच्या, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या हे चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि एकाचच नाही. तर, सगळे पक्ष तेच आहेत, सगळ्यांच्या फायली यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जातंय त्याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे, असे म्हणत दमानिया यांनी संताप व्यक्त केला. मला असं खूप वाटतंय की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं. बटेंगे तो कटंगे नही, हम साथ साथ लुटेंगे. हात जोडा परत परत आपण बघतोय हेच यंत्र तंत्र वापरला जात आहे आणि हे कुठेतरी आता थांबायला हवं, अशी सादही अंजली दमानिया यांनी जनतेला घातली आहे.
जरांडेश्वरचा लेखाजोखाच मांडला
2021 मध्ये जरंडेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती. त्यामध्ये, आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत, ज्या सुनेत्रा पवार व अजित पवार यांनी सुरू केलेल्या आहेत. मात्र, रेड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि अजित पवार कंपनीतून बाहेर पडले. पण आजतागायत त्यांच्या जवळचे नातेवाईकच ह्या कंपन्या चालवतात, असे दमानिया यांनी म्हटले. या सगळ्या प्रॉपर्टीजच्या अटॅच केले होत्या, त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. समजून घ्या एक साखर कारखाना जरंडेश्वर एस एस के नावाचा साखर कारखाना जो होता तो 1999-2000 साली सुरू होतो. सन 2010 साली त्याचा एन. पी. ए होतो. त्याचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं, म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक हे त्यांचा लिलाव करतात. या लिलावात हायस्पीडर कोण होतं तर गुरु कमोडिटी नावाची कंपनी होती, जी दहा वर्ष बंद असलेली कंपनी. ज्याचे फक्त ऑथराईज आहे ते कॅपिटल फक्त साडेसहा लाखाच्या आसपास होतं. ह्या गुरु कंपनीमध्ये सगळ्या कंपन्यांकडून पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनीची शेवटची त्या ऑर्डरमध्ये आणि आज मी हे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्सच्या कारवाई आधारे बोलते, असे म्हणत दमानिया यांनी अजित पवारांच्या कारभाराचा लेखाजोखाच पत्रकार परिषदेतून मांडला.