एक्स्प्लोर

अंबानींचं लग्न, शिवसेना-भाजपात जुंपली; तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार

अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यवांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची संधी सोडलीच नाही.

मुंबई : देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे सुपुत्र अनंत अंबांनीच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र धूम आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, राजकीय नेतेही मागे नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरेही या लग्नसोहळ्याला पोहोचले होते. त्यानंतर, तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा या लग्नसोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर करत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट केलं आहे. आता, भाजपच्या या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर त्यांची खोचक टीका केली. 

अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यवांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची संधी सोडलीच नाही. जो मराठी तरुण "गोविंद रे गोपाळा"  म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही. तो  महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला, अशी खोचक टीका भाजप आमदार आमदार आशिष शेलार यांनी केली होती.  भाजपच्या टीकेला शिवसेना समर्थकांनीही अमृता फडणवीसांचे नाव घेत प्रतिहल्ला केला होता. आता, सुषमा अंधारे यांनीही ट्विट करुन अमृतावहिनींचं नाव घेतलं आहे. तसेच, आशिष शेलार यांच्यावर तिखट शब्दात खोचक टीका केली. 

तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.अमृतावहिनी जशा राजकारणात नाहीत, त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का?, असा सवालही आशिष शेलार यांना टॅग करुन सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या या तिखट, खोचक टीकेमुळे भाजपा-शिवसेनेत आणखी शाब्दीक खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले होते आशिष शेलार  

आशिष शेलारांनी एक्स पोस्ट करत तेजस ठाकरेंच्या डान्सवर टीका केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जो मराठी तरुण "गोविंद रे गोपाळा"  म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही, ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत, जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही,जो होळीला "आयना का बायना.." म्हणताना कधी दिसला नाही, "गणा धाव रे... मला पाव रे.." म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही, तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला...! हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात "धकधक" झाले. असो हे नृत्य पण कसे "जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता  त्या तरुणाचे "संजयकाका" महाराष्ट्राला पटवून देतीलच...!

नितेश राणेंची टीका, आदित्य ठाकरेंचा पलटवार

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'अनंत अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या तेजस ठाकरेला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं.'  यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर देत म्हटलं की, त्यांना सायकॉलॉजी मदतीची खूप गरज आहे. परिणाम होतोय. 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget