धाराशिवमध्ये ओमराजेंविरोधात कोण लढणार? मुंबईत हालचालींना वेग; राणा जगजीत सिंह पाटील फडणवीसांच्या तर सुरेश बिराजदार अजितदादांच्या बंगल्यावर
Osmanabad Lok Sabha, Ranajagjitsinha Patil Meets Devendra Fadnavis : उस्मानाबाद लोकसभा (Osmanabad Lok Sabha) मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे.
Osmanabad Lok Sabha, Ranajagjitsinha Patil Meets Devendra Fadnavis : उस्मानाबाद लोकसभा (Osmanabad Lok Sabha) मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, उस्मानाबाद लोकसभेची जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाटेला येणार? यावर अद्याप शिक्कमोर्तब झालेला नाही. उस्मानाबादच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे सुरेश बिराजदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत.
महायुतीमध्ये उस्मानाबादची जागा कोणाच्या वाटेला?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादीकडून राणा जगजीत सिंह पाटील आमने-सामने होते. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी मोठा विजय मिळवला होता. महायुतीमध्ये उस्मानाबादची जागा शिवसेनेच्या वाटेला येत होती. मात्र, विद्यमान खासदार ठाकरेंच्या गटात आहेत. त्यामुळे या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. मात्र, राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची या मतदारसंघात काही अंशी ताकद वाढली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षही या जागेची मागणी करु शकतो. त्यामुळे अजित पवारांनी ही जागा लढवली तर सुरेश बिराजदार निवडणूक लढवू शकतात. भाजपने लढवली तर पुन्हा एकदा राणा जगजीत सिंह पाटील मैदानात उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांकडून सुरेश बिराजदार तर भाजपकडून राणा पाटील इच्छुक
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आजवर त्यांच्या पाठी विधानसभा किंवा लोकसभा लढवण्याचा अनुभव नाही. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यालोकसभा मतदार संघावर एनसीपी अजित पवार गट दावा करत आहे. मात्र राणा जगजित सिंह पाटील भाजपा तर्फे त्या मतदार संघात लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र दोघांमध्ये चर्चा काय झाली हे गुलदस्त्यातच आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबादतून (Osmanabad Lok Sabha) विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांनी विजय मिळवला. शिवाय, 2019 च्या निवडणुकीतही शिवसेनेनेच बाजी मारली होती. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 2019 मध्ये मोठा विजय मिळवला होता.
इतर महत्वाच्या बातम्या