(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe and Shivena Thackeray Group : अमोल कोल्हेंकडून देवदत्त निकमांचा 'भावी आमदार' म्हणून उल्लेख, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा, शाब्दिक बाचाबाची
Amol Kolhe and Shivena Thackeray Group : मंचरमध्ये महाविकास आघाडीमध्य बिघाडी झालेली पाहायला मिळाली आहे. शिरुर लोकसभेत विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हेंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
Amol Kolhe and Shivena Thackeray Group : मंचरमध्ये महाविकास आघाडीमध्य बिघाडी झालेली पाहायला मिळाली आहे. शिरुर लोकसभेत विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हेंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केलाय.
शिवसैनिक कशामुळे आक्रमक झाले?
अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. त्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सभेतून काढता पाय घेतला. सभास्थळावर शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
जे माझ्या मनात आहे, ते तुम्हाला सत्यात उतरवावे लागेल. 2019 च्या निवडणुकीत मी म्हणालो होतो की, या माणसाचे नाव देवदत्त आहे की विश्वास आहे? त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये कायम विश्वास जपला. 2024 च्या निवडणुकीमध्ये भलेभले मनात इमले बांधत होते. ते उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली. तुम्हा सर्वांना सोबत घेऊन आंबेगाव तालुक्यात इतिहास घडवला. ते भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब आहेत.
प्रचारात देखील आमचा अपमान झाला,आमची बदनामी करण्यात आली
प्रचारात देखील आमचा अपमान झाला. आमची बदनामी करण्यात आली. आम्ही फक्त तुमच्याकडे (अमोल कोल्हे) पाहून येतो. आम्हाला शिवसैनिकांनी उठवलं. आम्ही सभा स्थळावरुन उठत नव्हतो, अशी भूमिका घटनास्थळी कार्यकर्ता मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे अमोल कोल्हे त्यांची समजूत काढताना दिसत आहेत.
कोण आहेत देवदत्त निकम?
देवदत्त निकम हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्त मानले जातात. सध्याच्या घडीला ते मंचरमधील सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील त्याच्यावर संचालकपदाची जबाबदारी आहे. निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते. मात्र, 2023 मध्ये वळसे पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेले. तर देवदत्त निकम शरद पवारांसोबतच राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या
''भाजप आमदाराने आता मिशी कापावी''; पतीवरील टीकेला पत्नीचं उत्तर, काँग्रेस खासदारांचा पलटवार