Amit Shah On Ajit Pawar: आपल्या आमदारांची संख्या अधिक, उलट अजित पवार तक्रार घेऊन आले पाहिजेत; अमित शाह यांचा आमदारांना कानमंत्र
Amit Shah On Ajit Pawar: अजित पवारांची तक्रार करु नका...उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना, अमित शाह यांनी आमदारांना दिली.

Amit Shah On Ajit Pawar Maharashtra Politics: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या समोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात नाराजी सूर व्यक्त केला. अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा, असे म्हणत भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे साकडे घातले. यावर अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला.
भाजप आमदार अमित शाह यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले. यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांची तक्रार करु नका, उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी दिल्या. आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका, प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना म्हणाले. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंही अमित शाह यांनी सांगितले. नांदेडमध्ये सभेच्या दरम्यान हा प्रसंग घडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
2024 साली विधानसभेत भाजपा आमदारा समोर पराभूत उमेदवाराना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत असून भाजपा विरोधकांना ताकद देताय, याकडे लक्ष द्यावे...अशी तक्रारी पाढाच भाजपा आमदारांनी मंत्री यांनी अमित शाहा समोर मांडला. यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक,अशात मागे हटू नका...प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं अमित शाह यांनी आमदारांना म्हणाले.
उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत- अमित शाह
उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत, असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरु असल्याची माहिती देखील समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महापालिका निवडणुकीबाबत संकेत दिले आहेत. अमित शाह यांच्याकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

























