एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter Fake: देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला...; सामना अग्रलेखातून निशाणा

Akshay Shinde Encounter Fake: विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व शिंदे-फडणवीस सरकारला 'नाट्य' घडवून खळबळ माजवायची होती, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Akshay Shinde Encounter Fake: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत? अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले. अक्षय शिंदेप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही?, असा सवाल आजच्या (22 जानेवारी) सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. तसेच लोकांच्या मनात हा प्रश्न कायम सळसळत राहील. देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला...अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे. 

बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण देशभरात गाजले होते. संघ परिवाराचे लोक चालवत असलेल्या शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. संस्था चालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. संस्था चालक सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. दुसरे असे की, पीडित मुलीच्या आईची तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते व ती माऊली वणवण भटकत राहिली. बदलापूरचे लोक रस्त्यावर उतरले व दंगल पेटली तेव्हा गुन्हा दाखल झाला व संस्थेचा शिपाई अक्षय शिंदे यास अटक केली. अक्षय शिंदे याच्यासोबत आणखी आरोपी असावेत व ते संस्थेशी संबंधित 'बडे' लोक असावेत असा लोकांचा संशय होता. त्यांचे काय झाले ते फडणवीसांना माहीत. अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून त्यास कठोर शिक्षा देता आली असती, पण विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व शिंदे-फडणवीस सरकारला 'नाट्य' घडवून खळबळ माजवायची होती, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अक्षय शिंदेची हत्या होताच भाजप, शिंदे गट वगैरे लोकांनी त्याचा 'इव्हेन्ट' केला-

मतांचे गणित जमवायचे होते. त्यामुळे 23 सप्टेंबर 2024 ला तळोजा कारागृहातून न्यायालयात नेत असताना मुंब्रा बायपास येथे पोलिसांच्या व्हॅनमध्ये झालेल्या कथित चकमकीत अक्षय मारला गेला, अशी बोंब ठोकण्यात आली. या चकमकीवर तेव्हाच संशय निर्माण झाला होता, पण विषय लैंगिक शोषणाचा असल्याने सगळ्यांचीच तोंडे गप्प होती. अक्षयच्या हातात बेड्या असताना व चार मजबूत पोलीस व्हॅनमध्ये असताना एक सडपातळ आरोपी दंड बेड्या घातलेल्या हातांनी पोलिसांचे रिव्हॉल्व्हर खेचून हल्ला करून पळून जाण्याचा उद्योग करील काय? पण हे बनावट कथानक रचले गेले. विरोधकांनी गदारोळ केल्यावर या प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी झाली. आता चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर झाला व अक्षय शिंदेचे एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवून पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. पाच पोलिसांना आरोपीच्या हत्येस जबाबदार धरले. हे सर्व पोलीस आता नोकरीतून बडतर्फ होतील व त्यांच्यावर खुनाचे खटले दाखल होतील. म्हणजे ते पोलीस व त्यांची कुटुंबे रस्त्यावरच आली. अक्षय शिंदेची हत्या होताच भाजप, शिंदे गट वगैरे लोकांनी त्याचा 'इव्हेन्ट' केला. कारण विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व त्यांना मतांसाठी माहोल करायचा होता.

फडणवीस यांचा हाती बंदूक घेतलेला फोटो लावून त्यांना 'सिंघम' ठरवले-

अक्षय शिंदेच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांना जवळजवळ मिठ्याच मारल्या, पेढे वाटले, फटाके वाजले. अक्षय शिंदेला मारल्याचे श्रेय घेण्याची चढाओढ दोघांत लागली. 'देवाभाऊचा न्याय' अशी पोस्टर्स सर्वत्र झळकली व त्यात फडणवीस यांचा हाती बंदूक घेतलेला फोटो लावून त्यांना 'सिंघम' ठरवले. मात्र हे एन्काऊंटर आता चौकशी समितीनेच बनावट ठरविले आणि पाच पोलिसांना दोषी धरले. त्याचे काय करायचे? खरे तर ठाण्याचे पोलीस आयुक्त, ठाण्याचे पालकमंत्री व गृहमंत्री यांनासुद्धा कोर्टाने जबाबदार धरायला हवे. त्यांच्या संमतीशिवाय हा खून होणे शक्य नाही. अक्षय शिंदेचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला कठोर शिक्षा देणे गरजेचे होते. कोलकाता येथील महिला डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला तेथील न्यायालयाने सोमवारीच आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र त्यास फाशी व्हावी म्हणून प. बंगाल सरकार अपिलात गेले आहे. अशा प्रकरणात लोकभावना तीव्र असतात व त्यांना झटपट न्याय हवा असतो. हा झटपट न्याय कायद्याच्या व संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेसारखी हत्या प्रकरणे घडतात. अक्षय शिंदे हत्येनंतर बदलापूर-अंबरनाथ परिसरात मुलींवर लैंगिक अत्याचार व खुनाची सात-आठ गंभीर प्रकरणे घडली. कल्याणमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱया नराधम विशाल गवळीचे प्रकरण धक्कादायक आहे.

अक्षय शिंदेप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही? 

अक्षय शिंदेप्रमाणे या विशाल गवळीचेही एन्काऊंटर करा, अशी लोकांची मागणी होती. या प्रकरणात नराधम गवळीने मुलीचा खून केला, पण निवडणुका होऊन गेल्या. विशाल गवळीला बेड्या घालून एन्काऊंटर करण्यात पोलीस व त्यांच्या राजकीय बॉसना रस नसावा, अक्षय शिंदे प्रकरणात राज्याचे गृहमंत्री व पोलीस खात्याचा खोटेपणा उच्च न्यायालयाने उघडा केला. आता भाजप किंवा शिंदे गटाचे लोक उच्च न्यायालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार काय? की याचे खापर पंडित नेहरूंवर फोडून मोकळे होणार? अक्षय शिंदेचे खोटे एन्काऊंटर करणारा पोलीस अधिकारी संजय शिंदे हासुद्धा एक खाकी वर्दीतला गुन्हेगार आहे. पोलीस खात्यातील त्याची कारकीर्द गुन्हेगारी स्वरूपाची आहे. दाऊद इब्राहीम टोळीशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाले. अटकेत असलेल्या गुन्हेगारांना आर्थिक देवाणघेवाणीच्या मोबदल्यात मदत करणारा 'दयावान' म्हणून संजय शिंदे नामचीन आहे व सत्तेतल्या 'शिंदे'ने बेड्या घातलेल्या 'शिंदे'ला मारण्यासाठी या 'शिंदे'ला सुपारी दिली हे आता उघड झाले. हा खून पचला असता तर संजय शिंदे व त्याच्या टोळीला पोलीस शौर्यपदक देण्याची शिफारस झाली असती, पण न्यायालयाने खेळ संपवला आहे. यापूर्वी गुन्हेगार लखनभैया पाठक प्रकरणात 'खोटे' एन्काऊंटर झाले म्हणून उच्च न्यायालयाने वीस पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या प्रदीप शर्मा या पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. अक्षय शिंदेच्या बनावट एन्काऊंटरची पटकथा व दिग्दर्शनाचे काम पडद्यामागून याच प्रदीप शर्मा यांनी केल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत?, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. 

संबंधित बातमी:

Jyoti Jadhav: वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर; ज्योती जाधवच्या नावानं मांजरसुंब्यात मोठं घबाड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Embed widget