एक्स्प्लोर

Akola : अटकपूर्व जामीनासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षकाने लाखो रुपये उकळले, लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अंदाज येताच धुम ठोकली

अकोला : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा संशय येताच एक पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झाला.

अकोला : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा संशय येताच एक पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार घडलाय. एका प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन आणि त्यांच्या बाजूने चार्जशीट तयार करण्यासाठी अकोट शहर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याने तब्बल दीड लाखाची लाच मागितल्याचं हे प्रकरण आहे. तडजोड करून लाचेची रक्कम 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत पोहचली. दरम्यान राहुल देवकर असे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं 'एसीबी'चे अधिकारी मांजरे यांनी 'एबीपी माझा'ला माहिती दिली.

राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याची माहिती 

  अवैध सावकारी प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीला तात्काळ अटकपूर्व जामीन आणि आरोपींच्या बाजूनं चार्जशीट तयार करून तपास सोपा जावा यासाठी एपीआय राहुल देवकर यांनी तब्बल तक्रारदाराला दीड लाखाची मागणी केली होती. तडजोड़ करून लाचेची रक्कम ही 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत आली. दरम्यान लाच देणं तक्रारदाराला मान्य नसल्यानं त्यांनी अमरावतीच्या एसीबी कार्यालयात धाव घेतली, आणि आपली तक्रार नोंदवली. या प्रकरणात सर्व पडताळणी करून लाचखोर एपीआय राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याच सिद्ध झालं आहे. त्यानुसार आज लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राहुल देवकर हे अकोट शहरात दाखल झाले आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारली खरी. परंतु देवकर यांना एसीबीच्या कारवाईचा संशय आला. त्यानंतर लागलीच त्यांनी लाचेची रक्कम घेत आपल्या खाजगी चारचाकी वाहनानं पळ काढला. 

 पोलीस दलात एकच खळबळ उडाली 

दरम्यान 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी राहुल देवकर यांचा दूरपर्यंत पाठलाग केला. परंतू, ते हाती लागले नाहीत. आता या प्रकरणात अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी  बोलतांना दिली आहे. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकारी एपीआय राहुल देवकर यांच्या शोधात असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत घमासान! अपमान गिळून प्रचार करतोय, या 'सहा' मुद्द्यांवरून शिंदेंच्या आमदारांची खदखद बाहेर

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHAArvind Sawant : चंद्रचूड यांनी न्यायालयाला चूड लावली, अरविंद सावंतांची बोचरी टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Embed widget