Ajit Pawar In Beed: एक मिनिट ऐकायला शिक...कागद दिलंय ना...; अजित पवारांनी झापलं, कार्यकर्त्यांचा काढता पाय, VIDEO
Ajit Pawar In Beed: बीडचं पालकमंत्रिपद देखील अजित पवारांकडे आहे. स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यादरम्यान भेटण्यासाठी गेलेल्या समर्थकाला अजित पवारांनी चांगलेच खडसावले.

Ajit Pawar In Beed बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ते चांगलेच फटकरताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. मग त्यामध्ये सामान्य माणून असो किंवा अधिकारी अजित पवार हे नियमावर बोट ठेवून शिस्तीचे पालन करण्यास सांगत असतात. तसेच अजित पवार कार्यकर्ते असतील किंवा ठेकेदार त्यांनाही अनेकदा झापताना दिसतात. आजही बीडमध्ये अजित पवारांनी एका समर्थकाची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं.
बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देखील अजित पवारांकडे आहे. याचपार्श्वभूमीवर अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यादरम्यान सकाळी सात वाजता भेटण्यासाठी गेलेल्या समर्थकाला अजित पवारांनी चांगलेच खडसावले. एक आठवडापूर्वीच अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवारांनी ठेकेदाराला खडेबोल सुनावले होते.
अजित पवारांकडून समर्थकाची कान उघडणी, नेमकं काय घडलं?
एक समर्थक अर्ज घेऊन अजित पवारांकडे आला. यावेळी अजित पवारांनी तो अर्ज घेताच समर्थक काहीतरी बोलू लागला. यानंतर एक मिनिट ऐकायला शिक...कागद दिलंय ना...आम्ही तीन पक्षाचे सरकार आहे. महामंडळाचे वाटप अद्याप झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोणती महामंडळ हे ठरेल...आमच्या वाट्याला महामंडळ आलं तर आम्ही विचार करू...नाही आलं तर ज्यांच्या वाट्याला येईल त्यांना जाऊन भेटा, असं म्हणत एका सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाला चांगलंच फैलावर घेतलं. या समर्थकाची कान उघडणे केल्यानंतर इतर समर्थकांनी मात्र काढता पाय घेतला.
मला वाकड्यात जायला लावू नका; अजित पवारांचा इशारा
अजित पवारांनी गेल्या दिवसांआधीही बीडचा दौरा केला होता. यावेळी एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन अजित पवारांनी बीडकरांना केलंय. तर दुसरीकडे त्यांच्या स्टाईलने गुन्हेगारांना, आरोपींना, बीडमधील गुंडाना तंबीही दिली आहे. मला वाकड्यात जायला लावू नका, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला. मला वाकड्यात जायला लावू नका, सांगूनही ऐकलं नाही तर अशा लोकांना मोक्का लावण्यात येईल, मग पुन्हा काय चक्की पिसिंग पिसिंग....असे म्हणत अजित पवारांनी गुन्हेगारांना ठणकावून दम भरला. बीडसाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्यांकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, कुणीही चुकीचं काम करू नये, असे अजित पवारांनी बीडमधील कार्यक्रमात बोलतना म्हटले.























